Vespa आणि Aprilia Scooters वर गणेश चतुर्थी निमित्त तब्बल 20 हजारापर्यंत मिळणार कॅशबॅक
Vespa (Photo Credits-Twitter)

Piaggio India यांनी गणेश चतुर्थी निमित्त Aprilia आणि Vespa स्कूटर रेंजवर फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली आहे. ही फेस्टिव्ह ऑपर काही निवडक राज्य म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी आहे. या खास ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना दमदार कॅशबॅकची संधी मिळणार आहे. तर जाणून घ्या स्कूटर खरेदी केल्यामुळे तुमचा काय फायदा होणार आहे.(Mahindra च्या XUV500 वर ग्राहकांना मिळणार तब्बल 39 हजारांपर्यंत सूट, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स)

ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास Piaggio India सध्या Vespa SXL, VXL 125, 150 मॉडेल, Aprilia SR 160, SR 125 आणि Storm 125 च्या खरेदीवर 20 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर ऑनलाईन स्कूटर बुकिंगसाठी लागू नसणार आहे. गणेश चतुर्थी नंतर अनेक सणांना सुरुवात होते. त्यामुळे शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करणे चांगले मानले जाते. ही ऑफर येत्या 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहणार आहे. याच्या घोषणेनंतर Piaggio पहिला दुचाकी निर्माता कंपनी असून त्यांनी फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑफरची घोषणा केली आहे. परंतु जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यांना Piaggio पूरी रेंजवर 2 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे.(Innova Crysta ची CNG वेरियंट लवकरच होणार भारतात लाँच; या महिन्यात होऊ शकते भारतीय बाजारात एन्ट्री)

कंपनीने BS6 Aprilia आणि Vespa स्कूटर ही भारतात गेल्या महिन्यात लॉन्च केली होती. 2020 Vespa VXL, SXL 125 आणि 150 BS6 स्कूटर मध्ये नवी एलईडी हेडलाईटसह इंटीग्रेटेड डीआरएल, युएसबी मोबाईल चार्जिंग सपोर्ट आणि बूट लाइट सारखे फिचर्स लैस आहे. भारतीय बाजारात Vespa रेंजची सुरुवाती किंमत 1.10 लाख रुपये आहे. Aprilia Storm 125 डिस्क ब्रेक आणि डिझेल इंस्ट्रुमेंट कंसोल लैस आहे. याच्या किंमती बाबत बोलायचे झाल्यास त्याची सुरुवाती किंमत 1.12 लाख रुपये आहे. कंपनीची SR 160 ही सर्वाधिक पॉवरफुल स्कूटर असून त्यामध्ये 160cc चे BS6 इंजिन दिले आहे. जो 10.8 bhp ची पॉवर आणि 11.6Nm टॉर्क जनरेट करणार आहे.