
महिंद्रा कंपनी सध्या भारतीय बाजारात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्या XUV500 वर धमाकेदार सूट देत आहेत. ही सूट ग्राहकांना तब्बल 39 हजार रुपयांपर्यंत दिली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवी कार खरेदी करायचा विचार करत असल्यात जुलै महिन्यात त्यासाठी तुम्हाला उत्तम संधी आहे. कंपनीच्या ऑफर बाबत बोलायचे झाल्यास याची मूळ किंमत 13,19,999 रुपये आहे. परंतु ऑफरनुसार तुम्हाला 39 हजार रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना एक्सचेंज नुसार 30 हजारापर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच कॉर्पोरेट ऑफर अंतर्गत एक्सयुवीच्या खरेदीवर 9 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.
महिंद्रा एक्सयुवी 500 बद्दल अधिक माहिती द्यायची झाल्यास यासाठी 2179 cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 3750 Rpm वर 152.87Hp ची पॉवर आणि 1750-2800 Rpm वर 360 Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच ट्रान्समिशनसाठी यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आले आहेत.(Hyundai कंपनीकडून Aura या मॉडेलवर देण्यात येणार तब्बल 20 हजारापर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर्स)
कारच्या अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 15 सेमी मोनोक्रोम इंन्फोटेंनमेंट सिस्टिम डिस्प्लेसह युएसबी, ब्लूटूथ आणि ऑडिओ प्रोजेक्टर हेडलँम्प, मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉजी, डिजिटल इम्मोबिलाइजर, ड्युअल एअरबॅग्स, अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम दिली आहे. त्याचसोबत ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प, स्पीड अलर्ट, साइड इंपेक्ट्स बीम, क्रॅश प्रोटेक्शनसाठी क्रंपल झोन, इलेक्ट्रिकली ऑपरेटिड ड्युअल एचवीसी, टिल्ट पॉवर स्टिअरिंग, टेलिस्कॉपिक स्टिअरिंग, पॉवर अॅडजेस्टेबल ओआरवीएम, फ्रंट ग्रिल इंसर्ट, स्कफ प्लेट्स, टेलगेट एपिलिक, डोर सिल क्लेडिंग, फॉग लॅम्प बैजल, फुल व्हिल कॅम्प, ट्विन एग्जॉस्ट, रुफ रेल, रिवर्स पार्किंग, सोलर रिफलेटिंग्स ग्लास सारखे फिचर्स मिळणार आहेत.