Hyundai कंपनीकडून Aura या मॉडेलवर देण्यात येणार तब्बल 20 हजारापर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर्स
ह्युंदाई प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: hyundai.com)

देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Hyundai यांनी त्यांच्या नव्या सेडान Hyundai Aura खरेदीवर आकर्षक ऑफर देत आहे. जर तुम्ही भारतीय बाजारात Aura खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला दमदार सूटसह ऑफर्स सुद्धा मिळणार आहे. ऑफर बाबत बोलायचे झाल्यास Hyundai Aura च्या खरेदीवर जुलै महिन्यात तब्बल 20 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच ग्राहकांना 3 वर्षापर्यंत अनलिमिडेट किमी वॉरंटी आणि रोड राइड असिस्टंट (RSA) दिली जाणार आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास Hyundai Aura ची सुरुवाती एक्स शोरुम किंमत 5,79,900 रुपये आहे.

इंजिन आणि पॉवर बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. दुसरे 1 लीटर पेट्रोल इंजिन आणि तिसरे 1.2 लीटर डिझेल इंजिन दिले जाणार आहे. ट्रान्समिशनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये इंजिन स्मार्ट ऑटो AMT आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शन मिळणार आहे. (Innova Crysta ची CNG वेरियंट लवकरच होणार भारतात लाँच; या महिन्यात होऊ शकते भारतीय बाजारात एन्ट्री)

ब्रेकिंग सिस्टिमसाठी कंपनीकडून Hyundai Aura च्या फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. तर स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाल्यास Hyundai Aura च्या फ्रंटला मॅकफर्शन स्ट्र्ट सस्पेंशन आणि रियर मध्ये कपल्ड टोर्शियन बीम एक्स्ल सस्पेंशन दिले जाणार आहे. या कारची लांबी 3,995 mm, रुंदी 1680mm आणि उंची 1520mm, व्हिलबेस 2450mm आणि फ्युल टँक कॅपासीटी  37 लीटर आहे. सेफ्टी फिचर्ससाठी ह्युंदाईच्या या कारमध्ये स्ट्रॉन्ग बॉडी स्ट्रक्चर, अँन्टी ब्रेकिंग सिस्टिम, ईबीडी, ड्रायव्हर आणि पेसेंजर एअरबॅग्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इमर्जेंसी स्टॉप सिग्नल, ड्रायव्हर रियर व्यू मॉनिटर, रियर पार्किंग सेंसर आणि हेडलँम्प एस्कॉर्ट फंक्शनसारखे फिचर्स ही ग्राहकांना मिळणार आहेत.