Innova Crysta Representative Image (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या लॉकडाऊन कारप्रेमींना आपल्या कारमधून लाँग ड्राईव्ह सारख्या अनेक गोष्टींना मुकावं लागत आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगसाठी कारमध्ये मर्यादित प्रवासी असण्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे जर तुम्ही मोठी कार घेण्याच्या विचारात असाल तर जर थांबा! भारतात लवकरच Innova Crysta ची CNG वेरियंट असलेली नवी कोरी कार लाँच होणार आहे. अनेक Innova प्रेमी या कारची आतुरतेने वाट पाहात आहे. 2020 वर्षात तिस-या टप्प्यात ही कार भारतात लाँच होऊ शकते.

CNG असलेली Innova Crysta ची ही कार जुलै ते सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच होऊ शकते. ही कार पेट्रोल वेरियंटपेक्षा 1 लाखांपर्यंत महाग असू शकते. या कार च्या किंमतीबाबत अजून या कंपनीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा CNG मॉडल Level G ट्रिमवर आधरित असू शकतो.

हेदेखील वाचा- नव्या कार विक्रीच्या नावाखाली डिलरकडून तुम्हाला जुनी गाडी दिली जातेय? फसवणूकीपासून 'या' पद्धतीने रहा सावध

मार्चमध्ये लाँच झालेल्या इनोवा स्पेशल एडिशनविषयी बोलायचे झाले तर, यात अतिरिक्त क्रोम गार्निश, कारच्या चारही बाजूंना लीडरशीप के बेज, 17 इंचाची नवी ब्लॅक अलॉय वील्ज, रियर स्पॉयलर आणि साइट स्कर्टस दिले गेले आहेत. याला ड्यूल टोन कलर ऑप्शन देण्यात आले होते.

इनोवा च्या याआधी भारतात लाँच झालेल्या कारमुळे या कारमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. CNG व्यतिरिक्त यात आणखी काय वेगळेपण पाहायला मिळणार याचीही सर्वजण वाट पाहत आहेत.