TVS Ntorq 125 Race Edition (Photo Credits-Twitter)

TVS कंपनीने Ntorq 125 Race या मॉडेलचे स्पेशल अॅडिशन लॉन्च केले आहे. टीव्हीएसच्या या नव्या मॉडेलची किंमत 62,995 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्कूटरची किंमत एनटॉर्क 125 स्कूटरच्या स्टॅंन्डर्ड मॉडेलपेत्रा 3 हजार रुपयांनी जास्त आहे. स्कूटरच्या या नव्या मॉडेलमध्ये T आकार आणि एलईडी डीआरएलस एलईडी हेडलाईट देण्यात आली आहे, त्याचसोबत काही गोष्टींबाबत बदलाव सुद्धा करण्यात आलेले आहेत.

नव्या एलईडी हेडलाइट शिवाय स्कूटर ग्राहकांना रेड, ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये विकत घेता येणार आहे. स्कूटरच्या पुढील बाजूस अॅप्रन आणि साइड पॅलनवर चेकर-स्टाइल डेकल्स दिले आहेत. तसेच एनटॉर्कच्या या नव्या मॉडेलमध्ये हॅजर्ड लाइट आणि रेड अॅडिशनचे बॅज देण्यात आले आहे.(स्पोर्टी लूक सह जबरदस्त फिचर्स असलेली Hyundai i10 N Line लवकरच होणार भारतात लाँच)

Tweet:

तसेच कलर स्कीससोबत टीव्हीएस एनटॉर्क आता एकूण 8 रंगात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये 3 मॅटेलिक आणि 5 मॅट फिनिशिंग स्कूटर आहेत. मॅकानिकली स्पेशल अॅडिशनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. एनटॉर्क 124.88cc, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 7000 rpm साठी 9.4hp पॉवर आणि 5,500rpm साठी 10.5Nm टॉर्क जनरेट करु शकणार आहे. टीव्हीएस कंपनीच्या स्कूटरच्या या नव्या मॉडेलमध्ये ग्रागकांना ब्लूटूथ कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच एका फिचर्सच्या माध्यमातून तु्म्ही स्मार्टफोन स्कूटला कनेक्ट करु शकणार आहात.