Tata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km
Tata Tigor EV (Photo Credit : Youtube)

देशातील दिग्गज वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स भारतात आपली Tigor EV फेसलिस्टच्या लॉन्चिंग मुळे अधिकच चर्चेत आहे. ही कार भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे. याचे डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच आहे. तर जाणून घ्या या कारबद्दल अधिक माहिती. तसेच कंपनीकडून आणखी कोणते नवे फिचर्स यामध्ये देणार त्याबद्दल आम्ही तुम्हाला आज येथे सांगणार आहोत.(Maruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Tata Tigor EV फेसलिस्ट दोन वेरियंट्स नॉर्मल (Normal) आणि एक्सटेंडेड (Extended) रेंजमध्ये उतरवली जाऊ शकते. यामध्ये कंपनी दोन बॅटरी पॅक 16.2kWh आणि 21.5kWn चा वापर करु शकते. ज्याच्या पॉवरट्रेन सिस्टिममध्ये 70V इंडक्शन मोटर सुद्धा दिले जातील. जी 41bhp ची पॉवर आणि 105Nm चे टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. ड्रायव्हिंग रेंज बद्दल बोलायचे झाल्यास याचे स्टँडर्स मॉडेल 165km पर्यंत रेंज देणार आहे. तर एक्सटेंडेड मॉडेल सिंगल चार्जमध्ये 213km पर्यंत चालण्यास सक्षम असणार आहे.

सध्या विक्री केल्या जाणाऱ्या Tigor EV मॉडेलमधून ड्रायव्हिंग रेंज जवळजवळ 22 किमी अधिक असणार आहे. ही इलेक्ट्रॉनिक रुपात 80 किमी प्रति तास मर्यादित स्पीडसह येणार आहे. चार्जिंग संबंधित असे म्हटले आहे की, याचे एक्सटेंडेड मॉडेल 11.5 तास आणि स्टँडर्ड मॉडेल 8 तासात शून्य ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. तर फास्ट चार्जरच्या माध्यमातून 2 तासात 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.(देशातील 'या' सर्वाधिक स्वस्त CNG कार तुम्हाला माहिती आहेत का? ग्राहकांना मिळणार जबरदस्त मायलेज)

टाटा टिगोर ईवी फेसलिस्फमध्ये निळ्या रंगाचे हायलाइट्स आणि त्रिकोणी अॅरो पॅटर्न ग्रिल दिले जाणार आहे. याचे चार्जिंग सॉकेटसाठी ग्रिलमध्ये स्लॉट केला जाणार आहे. तर कॅबिन स्टँडर्ड टिगॉरसारखाच असणार आहे. त्याचसोबत असा अंदाज लावला जात आहे की, यामध्ये पारंपरिक आरपीएम गेजच्या स्थानावर कंपनी चार्ज मीटरसह कॅबिनमध्येच निळ्या हायलाइटचा वापर करु शकते.