Maruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Maruti Suzuki logo (Photo Credits: Wikimedia Commons)

नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिग्गज ऑटोमेकर Maruti Suzuki ने आपली अपकमिंग एसयुवी Jimny भारतात एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. ही 3 दरवाजे असलेले मॉडेल दुसऱ्या देशात पाठवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने Maruti Suzuki Jimny गेल्या काही दिवसांपासून भारतात लॉन्चिंग करण्याची तयारी केली जात आहे. मात्र आता कंपनीची Suzuki Jimny च्या 5 दरवाजे असलेल्या मॉडेल संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. ही एक बहुप्रतिक्षित एसयुवी असून त्याबद्दल भारतीय ग्राहकांना अधिक माहिती जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

Maruti Suzuki Jimny 5 Door Model बद्दल बोलायचे झाल्यास याची लांबी 3850 mm, रुंदी 1645 mm आणि उंची 1730 mm आहे. ही धमाकेदार एसयुवीचे व्हिलबेस 2550 mm आहे. याचे वजन 1190kg आहे. याचा ग्राउंड क्लिअयरेंन्स 210mm असणार आहे. या एसयुवीमध्ये 15 इंचाचे व्हिल्स आणि 195/80 टायर्स दिले जाणार आहेत.(Mahindra XUV700 ठरणार कंपनीची नवी 7 सीटर SUV, प्रीमियम फिचरसह जाणून घ्या काय असणार खास) 

इंजिन आणि पॉवरसाठी 1.5 लीटरचे 4 सिलिंडर K15 पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जे 6000rpm वर 101bhp ची पॉवर आणि 4,000rpm वर 130Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. याच्या इंजिनच्या ट्रान्समिशन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये फाइव स्पीड मॅन्युअल आणि फोर स्पीड ऑटोमॅटिक ऑप्शनसह मार्केट मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. तर लीक झालेल्या माहितीनुसार, Maruti Suzuki Jimny 5 Door मॉडेलमध्ये एक लीटर पेट्रोल मध्ये 13.6 किलोमीटर मायलेज देण्यास सक्षम असणार आहे.

maruti Suzuki Jimny एक ऑफ रोडिंग एसयुवी असून याची थेट टक्कर भारतात उपलब्ध असलेली महिंद्राची पॉप्युलर ऑफ रोड एसयुवी थार सोबत होणार आहे. ज्याचे नवे मॉडेल 2020 मध्ये लॉन्च केले आहे. 2020 मध्ये ऑटो एक्सपो दरम्यान ही एसयुवी शोकेस करण्यात आली होती. तेव्हापासून भारतात याच्या लॉन्चिंग बद्दल प्रतिक्षा केली जात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आता कंपनी भारतात ही एसयुवी लॉन्चिंग करण्याच्या तयारीत असून लवकरच त्याच्या तारेखेसंदर्भात घोषणा करणार आहे.