Tata Punch Micro-SUV Launched in India: मायक्रो एसयूव्ही टाटा पंच भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि इतर माहिती
Tata Punch Micro-SUV | (Photo Credits-Twitter)

टाटा मोटर्स कंपनीने आपली नवी मायक्रो एसयूव्ही टाटा पंच भारतात लॉन्च (Tata Punch Micro-SUV Launched in India) केली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या नव्या एययूव्ही टाटा पंच (Tata Punch Micro-SUV) गाडीची एका एक्स शोरुममधील किंमत 5.49 लाख रुपये सांगितली जात आहे. दरम्यान, या SUV चे टॉप मॉडेल क्रिएटीव्ही एएमटी 9.09 लाख रुपयांपर्यंत जात आहे. टाटाने नवी कार चार व्हेरिएट्स प्योर, अॅडव्हँचर, अकंपलिश्ड आणि क्रिएटीव्हमध्ये सादर केली आहे. टाटा ने नव्या पंचसोबतच नव्या मायक्रो SUV लाख सेगमेंटमध्ये बरीच खळबळ उडवली आहे. टाटाची नवी SUV रेनॉ क्विड, मारुति सुज़ुकी एस-प्रेसो आणि मारुति सुज़ुकी वैगनआर 1.2 च्या तुलनेत टाटाची पंच अपमार्केट होईल, असे सांगण्यात येत आहे.

टाटा एसयूव्ही पंच या गाडीची बाजारात मारुति सुज़ुकी इग्निस, स्विफ्ट आणि ह्यून्दे ग्रैंड आई10 निऑस सोबत टक्कर होईल, अशी चर्चा आहे. टाटाने ही SUV खास किंमतीसोबत लॉन्च केली आहे आणि डिसेंबर 2021 पर्यंत टाटा याच किमतीने ही SUV विक्री करणार आहे. टाटाच्या नव्या SUV च्या केबिनबाबत बोलाचे तर दोन टाटा पंचला दोन रंगाचा काळा आणि व्हाईट फिनश मिळाला आहे. जो अद्ययावत आहेत. दिसायलाही सुंदर. कारचा डॅशबोर्ड अगदी साधा आणि स्वच्छ आहे. जो नीळ्या रंगासोबत आडवा एसी व्हेंट फंकी लुकमध्ये आहे. इते अल्ट्रोजवाला इंस्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला मिळतो. पाठिमागच्या प्रवाशासाठी एसी व्हेट्स देण्यात आले आहेत. (हेही वाचा, Triton ने भारतात सादर केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जमध्ये करेल 1200 किमी चा प्रवास)

व्हिडिओ

टाटा पंचने सुरक्षेबाबत जागतीक ग्लोबल एनकॅपमध्ये 5 स्टार मिळवले आहेत. मायक्रो एसयूव्हीचे क्रॅश परिक्षण करण्यात आले आहे. जी ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी मोठी उपलब्धी बनली आहे. टाटाच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार इतक्या छोट्या कारनेही सुरक्षा परिमानात चांगली कामगिरी दर्शवली आहे.