Tata Motors | (Photo Credits: Tatamotors.com)

टाटा मोटर्स (Tata Motors) 'भारतात लवकरच काही दमदार कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जी एसयुवी आणि एमपीवी सेगमेंट मधील असणार आहे. Harrier आणि Nexon एसयुवीने भारतात धमाका केल्यांर आता टाटा Kia Seltos आणि Hyundai Creta सह अन्य पॉप्युलर कारला टक्कर देण्यासाठी 8 ते 20 लाखांच्या दरम्यान काही कार लॉन्च करणार आहे. यामध्ये Tata Epiq, Tata Taureo आणि Tata Spyk च्या मॉडेलचा समावेश आहे. मात्र यामधील कोणताही कार एसयुवी आणि एमपीवी आहे ते स्पष्ट करण्यात आलेले नाही.

त्याचसोबत टाटा मोटर्स पुढील वर्षात Gravitas सारखी 7 सीटर आणि Hronbill सारखी 5 सीटर कारसह संभाव्य Blackbird नावाने मिड साइज एसयुवी लॉन्च करु शकते. अशातच लोकांना आता उत्सुकता लागली असून की कोणती कार किती रेंज मध्ये असणार आहे. त्याचसोबत ती भारतात कधी लॉन्च केली जाणार याबद्दल ही प्रतिक्षा केली जात असणार.(Diwali 2020 Discounts on Cars: दिवाळीनिमित्त लोकप्रिय कार्सवर मिळत आहे 3 लाखांपर्यंत सूट; Mahindra Alturas G4, Jeep Compass, Tata Harrier, Honda Civic, Kia Carnival, Maruti S-Cross गाड्या सवलतीच्या दरात घेण्याची संधी)

टाटा कंपनीची अपकमिंग कार मॉडेल Epiq, Taureo आणि Spyk मधील एक एमपीवी म्हणजेच मल्टी पर्पज व्हेईकल असणार आहे. असे बोलले जात आहे की, Tata Taureo एमपीवी असू शकते. जी अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. या कारध्ये नेक्सॉन सारखे 1.5L पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन दिले जाऊ शकते. कारची टक्कर मारुती सुजुकी एर्टिगा सोबत एमजी, किआ आणि ह्युंदाईची अपकमिंग एमपीवीसी सोबत होणार आहे.

टाटा मोटर्स येत्या काळात मिड साइज सेडान सुद्धा लॉन्च करु शकते. जी अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार केली जात असल्याची चर्चा आहे. नेक्स्ट जनरेशन Tata Nexon, Tata Tiago आणि Tata Tigor सारख्या कार ही या अल्फा प्लॅटफॉर्मवर डेव्हलप होणार आहे. या सर्व गाड्यांमध्ये एक्सटीरियर आणि इंटीरियर संदर्भात बदल करण्यात आलेला आहे. असे मानले जात आहे की, Tata Epiq आणि Tata Spyk मधील कोणती तरी एक कार इलेक्ट्रिक असू शकते.  इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी  Altroz EV, Blackbird EV आणि HBX EV सारख्या कार लॉन्च केल्या जाऊ शकतात.