Diwali 2020 Discounts on Cars: दिवाळीनिमित्त लोकप्रिय कार्सवर मिळत आहे 3 लाखांपर्यंत सूट; Mahindra Alturas G4, Jeep Compass, Tata Harrier, Honda Civic, Kia Carnival, Maruti S-Cross गाड्या सवलतीच्या दरात घेण्याची संधी
Diwali 2020 Discounts on Cars (Photo Credits: Maruti, Tata, Jeep)

दिवाळी (Diwali 2020)... दिव्यांचा सण देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. फराळ, फटके, रांगोळी, नवीन कपडे, दिवे, पूजा अशा गोष्टींच्या सानिध्यात हा उत्सव साजरा होतो. दरवर्षी हा खास काळ घरी नवीन वस्तू आणण्यासाठी खूप शुभ मानला जातो. लोकही याबाबत उत्साही असतात. अनेकदा या उत्सवाच्या हंगामात लोक नवीन कार, बाईक, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेतात. यंदा दिवाळीदरम्यान अनेक ऑटो कंपन्यांनी भारतीय ग्राहकांची खरेदीची भावना लक्षात घेऊन, आपल्या उत्पादनांवर मोठी ऑफर जाहीर केली आहेत. तर यंदा सणाच्या निमित्ताने तुम्ही अशा ऑफर्सचा लाभ घेऊन कार विकत घेऊ शकता.

Mahindra -

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महिंद्रा (Mahindra) आपल्या गाड्यांवर 3.06 लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. दिवाळीच्या ऑफर्समध्ये 2.4 लाख रुपये रोख लाभ आणि आपली जुनी कार एक्सचेंजसाठी 50,000 रुपयांची सवलत मिळत आहे. शिवाय खरेदीदारांसाठी 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतही उपलब्ध आहे. फ्लॅगशिप एसयूव्ही व्यतिरिक्त, भारतीय कार निर्माता XUV300, XUV500, Bolero, Scorpio, Marazzo आणि KUV100 वरही मोठ्या प्रमाणात लाभ देत आहे.

Kia Motors India -

किया मोटर्स इंडियादेखील (Kia Motors India) आपल्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर  सूट देत आहे. दक्षिण कोरियन कंपनी कार्निवल एमपीव्हीवर (Carnival MPV) अडीच लाख रुपये सूट देत आहे. प्रीमियम आणि प्रेस्टिज ट्रिमवर 2.50 लाख तर लिमोझिन ट्रिम वर 1.92 लाख सवलत मिळत आहे. यात वर्षांच्या 3 वर्षांच्या देखभाल पॅकेजसह 80 हजार रुपये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत समाविष्ट आहे. सोनेट (Sonet) आणि सेल्टोस (Seltos) कारवर कोणतीही सूट दिली गेली नाही.

Jeep India-

जीप इंडियाने आपल्या लोकप्रिय, कंपास एसयूव्हीसाठी (Compass SUV) काही आकर्षित ऑफर्स आणल्या आहेत. Jeep Compass Longitude Plus 1.8 लाखांपर्यंतच्या फेस्टीव्ह सूटसह खरेदी करता येईल. यात रोख फायदे आणि एक्सचेंज बोनसही आहे.

Tata Motors -

टाटा मोटर्स (Tata Motors) ही आणखी एक कार निर्माता कंपनी आपल्या खास ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करत आहे. डार्क एडिशन मॉडेल व्यतिरिक्त टाटा हॅरियर एसयूव्हीवर (Tata Harrier SUV) 80,000 हजारांची सवलत आहे, याशिवाय 25 हजार रोख बोनस, 15 हजार कॉर्पोरेट स्कीम आणि 40 हजार एक्सचेंज बोनस मिळत आहे. याव्यतिरिक्त, या दिवाळीत टियागो, टिगोर आणि नेक्सन कार्सवरही ऑफर्स आहेत.

Honda-

देशभरातील निवडक होंडा (Honda) विक्रेत्यांनी आपल्या गाड्यांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. Civic Diese वर अडीच लाख रुपयांची सूट आहे. पेट्रोल मॉडेलला 1 लाख रोख सवलत मिळत आहे. ऑफर्स देण्यात आलेल्या होंडा मोटर्सच्या इतर गाड्यांमध्ये Jazz, WR-V, Amaze इत्यादींचा समावेश आहे.

Maruti Suzuki India-

भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी, मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) देखील या उत्सवाच्या काळात ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स देत आहे. मारुती एस-क्रॉसवर (Maruti S-Cross) काही विक्रेते दिवाळीचा लाभ देत आहेत. एस-क्रॉस सिग्मा (S-Cross Sigma) पेट्रोल व्हेरियंटवर 68 हजार रुपयांची सूट, 37 हजार रुपयांचा एक्सेसरीज पॅक, 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 11 हजार रुपये कॉर्पोरेट लाभ मिळत आहे. (हेही वाचा: GoZero Electric Cycle: भारतात लाँच झाली स्वस्त इलेक्ट्रिक सायकल; एकदा चार्ज केल्यानंतर 25 किलोमीटर धावणार; जाणून घ्या किंमत)

(टीप- वरील लेखामध्ये नमूद केलेल्या गोष्टी फक्त माहिती म्हणून दिलेल्या आहेत. गाडी विकत घेताना डीलर अथवा कंपनीशी या ऑफर्सची खात्री करून घ्या)