Tata कंपनीच्या Altroz कारवर धमाकेदार सूट, ग्राहकांना फक्त 5,555 रुपयात गाडी घरी घेऊन जाता येणार
Altroz Tata (Photo Credits-Twitter)

टाटा कंपनी (Tata Company)  त्यांच्या Altroz हॅचबॅक कारवर ग्राहकांना शानदार ऑफर देत आहे. कंपनीने नव्या EMI स्किम अंतर्गत ग्राहकांना ही कार फक्त 5,555 रुपये मासिक हप्त्यावर रुपये घरी आणता येणार आहे. ही प्रिमियम हॅचबॅक कार वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आली होती. टाटा कंपनीची ही कार मारुति Baleno, ह्युंदाई Elite i20, होंडा Jazz सारख्या कारला टक्कर देण्यासाठी उतवरण्यात आली. कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार देण्यात आले आहेत.

याच पद्धतीची ऑफर कंपनीने त्यांची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार Tiago साठी सुद्धा काढली होती. ऑफर अंतर्गत ज्या ग्राहकांना Altroz खरेदी करायची आहे त्यांना या स्किमचा लाभ घेता येणार आहे. स्किमच्या अंतर्गत ग्राहकांना पहिल्या 6 महिन्यांसाठी 5,555 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. ही रक्कम 5.5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी लागू असणार आहे. कर्जाची अधिकतम सीमा 5 वर्षापर्यंक असू शकणार आहे. गेल्या महिन्यानंतर EMI ची रक्कम हळूहळू वाढणार आहे.(Own-Online: लॉक डाऊनमध्ये घर बसल्या ऑनलाईन विकत घेऊ शकणार महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्या; कंपनीने सादर केला Online platform)

टाटा अल्ट्रॉज कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह येते. याची किंमत 5.29 लाख रुपयांपासून सुरु आहे. यामधील टॉप वेरियंटची किंमत 9.29 लाख रुपयापर्यंत आहे. ही त्यांच्या सेग्मेंट मधील पहिली कार असून त्याचे दरवाजे 90 डिग्रीहून अधिक खुलतात. कारच्या पेट्रोल वर्जनमध्ये 1.2 लीटरचे इंजिन देण्यात आले असून जी 85Ps पावर आणि 114Nm चे टॉर्क जनरेट करतो. तसेच डिझेल वेरियंटमध्ये 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले असून जे 90 Ps पॉवर आणि 200Nm चा टॉर्क जनरेट करतात.(Coronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही)

यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँटर्ज देण्यात आले आहे. तसेच कार ऑटोमेटिक ट्रान्समिशन मध्ये येत नाही. कारमध्ये 7 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम, प्रोजेक्टर हेडलॅम्र, एलईडी डीआरएल, फ्रंट डीआरएल आणि रियर फॉग लॅम्पसह रियर डिफॉगर सारखे फिचर्स मिळणार आहेत.