भारतात सुजुकी (Suzuki) कंपनीची हायाबुसा (Hayabusa) गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या बाइकच्या लॉन्चिंग संदर्भात लोकांमध्ये उत्सुकता अधिक आहे. भारतातच नव्हे तर जगभरात या बाइकचा अधिक पसंदी मिळाली आहे. अशातच ही बाइक सध्या या महिन्यात भारतात लॉन्च केली जाणार आहे. ज्याची पुष्टी सुजुकी मोटरसायकल इंडिया यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या द्वारे केली आहे. 2021 हायाबुसाच्या नव्या मॉडेलला अपडेटेड डिझाइन, नवे फिचर्स आणि Euro V उत्सर्जन मानदंडाच्या अनुरुप इंजिन दिले जाणार आहे. तर सुझुकी हायाबुका बद्दल अधिक माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.(देशातील 'या' सर्वाधिक स्वस्त CNG कार तुम्हाला माहिती आहेत का? ग्राहकांना मिळणार जबरदस्त मायलेज)
नवी हायाबुसा सिल्क आणि शार्प बॉडीवर्कसह येणारआहे. दरम्यान यामध्ये जुने मॉडेल (BS4) च्या तुलनेत कमी पॉवर आणि टॉर्क दिला जाणार आहे. 2021 सुजुकी हायाबुसा सध्या 1340cc लिक्विड कूल्ड, डीओएचसी, 16 वॉल्व, इन-लाइन चार इंजिन दिले जाणार आहे. ही स्पोर्ट्स टुरिंग मोटरसायकल 9700rpm वर 187bhp ची पॉवर आणि 150Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, नवी हायाबुसाची टॉप स्पीड 299 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे. याचे वजन आता 264 किलोग्रॅम झाले आहे. जे आधीच्या तुलनेत जवळजवळ 2 किलोग्रम कमी आहे. नव्या उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी याच्या एग्जॉस्ट मध्ये टू स्टेट कॅटेलिक कनवर्टर मिळणार आहे. तर बाइकमध्ये एर्गोनॉमिक्समध्ये थोडा मोड दिला गेला आहे.(One Wheel Electric Bike: चिनी ई-कॉमर्स ग्रुप अलीबाबा ने लाँच केली 'वन व्हील इलेक्ट्रिक बाईक'; जाणून घ्या किंमत आणि खास स्पेसिफिकेशन्स)
2021 सुझुकी हायाबुसा ड्राइव्ह मोड सेलेक्टर अल्फा (SDMS-a) लैस असणार आहे. ज्यामध्ये पॉवर मोड सेलेक्टर, इंजिन ब्रेक कंट्रोल सिस्टिम, अॅन्टी लिफ्ट कंट्रोल सिस्टिम, मोशन ट्रॅक ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम आणि बाया डारेक्शनल क्विक शिफ्ट सिस्टिम दिले गेले आहे. रिपोर्टनुसार, या बाइकची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.