Skoda Rapid Rider Plus भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Skoda Rapid Rider Plus (Photo Credits-Twitter)

Skoda Auto India यांनी त्यांची Skoda Rapid Rider Plus भारतात नुकतीच लॉन्च केली आहे. या गाडीसाठी किंमत 7.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Skoda Rapid Rider Plus ही बाजारात Candy White, Carbon Steel, Brilliant Silver आणि Toffee Brown रंगात ग्राहकांना खरेदीसाठी उपब्ध करुन दिली आहे. जर तुम्ही स्कोडा कंपनीची ही नवी कोरी कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ती तुम्हाला Skoda Auto डिलरशिप यांच्याकडे उपलब्ध आहे.

Skoda Rapid Rider Plus च्या डिझाइन बाबत बोलायचे झाल्यास त्यासाठी ब्लॅक आणि सिल्वर डिझाइन एलिमेंट्स देण्यात आले आहेत. ब्लॅक स्कोडा सिग्नेचर ग्रिल दिली आहे. तसेच साइड फॉइल, ग्लॉसी ब्लॅक बी पिलर, विंडो क्रॉम ग्रानिश ही देण्यात आले आहे. यामध्ये नवे ड्युअल टोन इबोनी सँड इंटिरियर, प्रीमियम इवोरी स्लेट अपहोल्स्ट्रीसह मॉर्डन पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.

कंफर्टबाबत माहिती देत कंपनीने असे म्हटले आहे की, सेडान मध्ये 16.51 cm कलर टचस्क्रिन सेंट्रल इंफोटेनमेंट सिस्टिम दिली आहे. जी SmartLink™ टेक्नॉलॉजी लेस आहे. याच्या माध्यमातून नेविगेशन सारखे फिचर इंफोटेनमेंट स्क्रिनवरुन कंट्रोल करता येणार आहेत. त्याचसोबत स्मार्टफोनच्या मदतीने कनेक्ट करण्यासह USB/AUX-in/Bluetooth ऑप्शन ही देण्यात आले आहेत. तसेच MirrorLink®, Apple CarPlay आणि Android Auto यांना सपोर्ट करते.(MG Hector Plus SUV भारतात लॉन्च, जाणून याची वैशिष्ट्ये आणि किंमतीविषयी)

Skoda Rapid Rider Plus मध्ये 999 cc चे तीन सिलिंडर असणारे 1.0 TSI पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 108.40 hp ची पॉवर आणि 175 Nm टॉर्क जनरेट करु शकतो. ट्रान्समिशनबाबत बोलायचे झाल्यास नव्या स्कोडा रॅपिड रायडर प्लसमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. मायलेजसाठी मॅन्युअल ट्रान्समिशन वेरियंट 18.97 Kmpl मायलेज देऊ शकते.(Mahindra कंपनीची धमाकेदार ऑफर, जुलै महिन्यात गाडी खरेदी केल्यास मिळणार तब्बल 3.05 लाखांपर्यंत सूट)

सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल माहिती द्यायची झाल्यास स्कोडा रॅपिड रायडर प्लसमध्ये ड्युअल एअरबॅग्स, अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम स्टँडर्ड देण्यात आले आहेत. या सेडानसाठी पार्कट्रॉनिक रियर पार्किंग सेंसर्स, अॅन्टी ग्लेर इंटिरियर रियर व्यू मिरर, रियर विंडस्क्रिन डिफॉगरसह टायमर, फ्रंटला हाइट अॅडजेस्टमेंट थ्री पॉइंट सीट बेल्ट, रफ रोड पॅकेड, क्रॅशमध्ये फ्युल सप्लाय कट ऑफ आणि फ्लोटिंग कोड सिस्टिमसह इंजिन इम्मोबिलायझर ही दिला आहे.