Royal Enfield Thunderbird 500X ABS : जाणून घ्या खासियत आणि किंमत
Royal Enfield Thunderbird 500X ABS (फोटो सौजन्य- Twitter)

रॉयल इन्फिल्ड (Royal Enfield) या कंपनीने बुलेटचे (Bullet) नवे मॉडेल Thunderbird 500X ABS हे वर्जन बाजारात आणले आहे.  या बुलेटची किंमत 2.13 लाख रुपये असणार आहे. तर Thunderbird 500X Non-ABS वर्जनपेक्षा 14,000 रुपयांनी जास्त असणार आहे. त्यामुळे भारतात रॉयल इन्फिल्ड सर्वात महाग Single-cylinder बाईक ठरली आहे.

या रॉयल इन्फिल्डच्या नव्या मॉडेलमध्ये ABS हे फक्त नवीन फिचर्स आणले असून बाकी कोणताही बदल या बुलेटमध्ये करण्यात आलेला नाही. तसेच 499CC,Air Cooling,Single-Cylinder Engine यंत्रणा दिली गेली आहे. तर  5,250rpm वर 27.2hp ची ऊर्जा आणि 4,000rpm वर 41.3 Nm टॉर्क जनरेट करु शकणार आहे. या बुलेटचे इंजिन 5 Speed Gearbox पेक्षा कमी असणार आहे. मात्र या बुलेटच्या सस्पेन्शनबद्दल सांगायचे झाले तर, या बुलेटच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरसाठी ट्विन शॉक अॅब्जॉर्ब देण्यात आले आहे.

बाईकच्या बाबतीत असे सांगण्यात येते की, भारतात 1 एप्रिल 2019 पासून 125CC किंवा त्याहून अधिक क्षमता असणाऱ्या बाईकमध्ये ABS असणे जरुरीचे ठरणार आहे. त्यामुळे रॉयल इन्फिल्ड सातत्याने आपल्या बुलेट मॉडेलमधील ABS कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यामध्ये Classic 350 Signals Addition मध्ये ABS देण्यात आले होते. त्यानंतर Classic 500 आणि Himalayan या मॉडेलमध्ये ABS दिले गेले. तर गेल्या महिन्यात Thunderbird 350X या मॉडेलला ABS देण्यात आले आहे.

ABS म्हणजे काय?

Anti Lock Breaking System किंवा ABS हे दुचाकी वाहनांसाठी महत्वपूर्ण फिचर असून ते चालकाच्या सुरक्षतेसाठी वारपले जाते. तसेच Anti Skid Breaking असे ही म्हटले जाते. तर सुरक्षित बाईक चालविण्यासाठी याचा फार उपयोग होतो. या System मुळे अचानक गाडीचे ब्रेक दाबल्यास गाडी अनियंत्रित होत नाही. तर अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे होणारी दुर्घटनासुद्धा टळते.