Royal Enfield लवकरच आणणार इलेक्ट्रिक मोटरसायकल
Royal Enfield (Photo Credit: Royalenfield.com)

रॉयल इनफिल्ड (Royal Enfield ) लवकरच इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे सीईओ विनोद दासरी यांनी असे म्हटले की, कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्समधील एक नव्या रेंजमधील मॉडेल आणणार आहे. त्याचसोबत हे मॉडेल जागतिक स्तरावर सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. इकोनॉमिक्स टाइम्स यांच्या एका मुलाखतीत असे ही त्यांनी सांगितले की, देशात मंदीचे जरी सावट असले तरीही आम्ही गुंतवणूकीत कपात केली नाही.

तर बुलेटसाठी प्रसिद्ध असणारी रॉयल इनफिल्ड 2.0 नावाने ओळखली जाणार आहे. त्यामध्ये 4 महत्वपूर्ण अॅक्शन पॉईंट्स आहेत. या चारही प्रॉडक्डची रेंज वाढवण्यासाठी अधिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार आहे. तसेच रॉयल एनफील्ड कंपनीने बुलेट 350 केसच्या किंमतीत 2 हजारांनी वाढ केली आहे तर, बुलेट 350 ईसच्या किंमतीत 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. या बाईकमध्ये सिंगल चॅनेल एबीएस सिस्टम देण्यात आले आहे. तसेच या दोन्ही बाईक ड्युअल चॅनेल एबीएस व्हर्जनमध्येही उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे, बुलेट कंपनी अधिक जुनी असून अनेक लोकांचा रॉयल एनफिल्डच्या प्रोडक्टवर विश्वास आहे.(Harley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर)

काही दिवसांपूर्वीच ओकिनावा कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कुटर ओकिनावा लाइट (Okinawa Lite) नुकतीच भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कुटर भारतीय बाजाराचा अंदाज घेऊन त्याचे डिझाइन बनवले असल्याचे सांगितले आहे. भारतीय बाजारात या स्कुटरची किंमत 59,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ही इलेक्ट्रिक स्कुटर शहरात कमी अंतर पार करण्यासाठी योग्य पर्याय ठरु शकते असे सुद्धा कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्याचसोबत इकोफ्रेंडली स्कुटर आहे.कंपनीच्या मते ओकिनावा लाइट इलेक्ट्रिक स्कुटर खासकरुन तरुण आणि महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. स्कुटरमध्ये लीथियम-आयन बॅटरी देण्यात आलीअसून ती डिटॅच करता येऊ शकते. ओकिनावा स्कुटरची बॅटरी आणि मोटारची वॉरिंटी 3 वर्षापर्यंत आहे. तसेच स्कुटरमध्ये वॉटरप्रुफ 250wt BLDC मोटार देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 40 वोल्ट, 1.25KWH लीथियम आयन बॅटरी दिली आहे.