Royal Enfield ने सर्वात जास्त विक्री होणाऱ्या Meteor 350 बाईकच्या किंमती वाढवल्या; जाणून घ्या नवीन किंमत
Royal Enfield (Photo Credit: Wikimedia Commons)

Royal Enfield: देशातील आघाडीच्या बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने भारतात आपल्या नवीन बाइक Meteor 350 च्या किंमती वाढवल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये बाजारात आल्यापासून प्रथमचं या बाईकची किंमत वाढली आहे. Meteor बाईक फायरबॉल, स्टेलर आणि सुपरनोव्हा या तीन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली होती. याची किंमत अनुक्रमे 1.76 लाख रुपये, 1.81 लाख रुपये आणि 1.50 लाख रुपये होती. (MG ने लॉन्च केली MG Hector फेसलिफ्ट, फिचर्ससह पॉवर संबंधित Creta ला देणार टक्कर)

नवीन किंमतींची यादीः

किंमत वाढल्यानंतर, एंट्री लेव्हल मॉडेल फायरबॉल आवृत्तीची किंमत 1.78 लाख रुपये, स्टेलर आणि सुपरनोवा ट्रिम्सची किंमत अनुक्रमे 1.84 लाख रुपये आणि 1.93 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. आरईच्या या नवीन बाईकला लॉन्च झाल्यापासून बाजाराकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. याचा परिणाम म्हणून, डिसेंबर 2020 मध्ये रॉयल एनफील्डने वर्षाचा सर्वाधिक विक्रीचा आकडा नोंदविला. (वाचा - Maruti WagonR आणि Ignis सारख्या दमदार गाड्या आता भाड्याने चालवता येणार, 12 हजारांपासून EMI सुरु)

सर्वाधिक विक्री होणारी बाईक:

कंपनीने डिसेंबरमध्ये एकूण 68,995 युनिट विक्री करण्यात यश मिळविले. ज्यामध्ये कंपनीच्या 63,580० युनिट्सचा समावेश होता. कंपनीची नवीन बाईक नवीन डबल-डाउन डाउन्रेड क्रॅडल फ्रेमवर तयार केली गेली आहे. बाईकमध्ये कंप कमी करण्यासाठी 349सीसी सिंगल सिलिंडर सुसज्ज इंधन इंजेक्टेड इंजिन दिले गेले आहे. जे 6,100 आरपीएम वर 20.2 बीएचपी आणि 4,000 आरपीएम वर 27 एनएम टॉर्कची उर्जा उत्पन्न करते.

डिझाइन आणि वैशिष्ट्येः

Royal Enfield Meteor 350 थंडरबर्डसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामध्ये गोलाकार एलईडी डीआरएल, चंकी इंधन टाक्या आणि पॉड-आकाराचे टेल लॅम्प असलेले गोल हेडलॅम्प आहे. त्याचवेळी बाईकमध्ये नवीन सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि कलर टीएफटी डिस्प्ले सारख्ये फिचर्स देण्यात आले आहेत.