MG ने लॉन्च केली MG Hector फेसलिफ्ट, फिचर्ससह पॉवर संबंधित Creta ला देणार टक्कर
MG Hector (Photo Credits: MG Motor India)

दिग्गज ब्रिटिश कार मेकर कंपनी MG ने भारतात गेल्या दिवसात भारतात आपली पॉप्युलर एसयुवी एमजी हेक्टरचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केले आहे. इंडियन मार्केटमध्ये यासाठी Hyundai Creta ला मोठी टक्कर देऊ शकते. तर एमजी हेक्टर 5 सीटर आणि ह्युंदाई क्रेटावर यापैकी कोणती कार दमदार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Maruti WagonR आणि Ignis सारख्या दमदार गाड्या आता भाड्याने चालवता येणार, 12 हजारांपासून EMI सुरु)

एमजी हेक्टर ची लोकप्रियता लक्षात घेता कंपनीने याच्या फेसलिफ्ट वर्जनचे मॉडेल नुकतेच लॉन्च केले होते. कारच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास नव्या Hector मध्ये नवी फ्रंट ग्रिलवर क्रोम टिप्स दिले गेले आहे. जे या दमदार एसयुवीला शार्प अपिअयरंन्स देणार आहे. यामध्ये बदलण्यात आलेले अलॉय व्हिल्स सुद्धा पहायला मिळणार आहेत. 2021 Hector Facelift चे एक्सीटीरियर डिझाइन आधीपासूनच अधिक अग्रेसिव्ह आहे. त्याचसोबत फुल LED पॅकेज आणि फ्लोटिंग LED स्वाइप इंडिकेटर्स या एसयुवीला अधिक लूक देते.

तर इंटीरियरवर आता वेटिंलेटेड फ्रंट सीट, वायरलेस चार्जिंग, ड्युअल टोन बेज आणि लेदर सीट सारखे प्रीमियम फिचर्स दिले आहेत. या व्यतिरिक्त ही कार आता हिंग्लिश वॉइस कमांडला सुद्धा सपोर्ट करणार आहे. इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजि, 1.5 लीटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन आणि 2.0 लीटर डिझेल इंजिन मिळणार आहे. नव्या एमजी हेक्टरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. किंमती बद्दल बोलायचे झाल्यास नव्या हेक्टर 5 सीटरची किंमत 12.89 लाख ते 18.32 लाखांपर्यंत असणार आहे.

नव्या जनरेशनची क्रेटा गेल्या वर्षात लॉन्च केली होती. कारच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये मोठे बदल पहायला मिळणार आहे. याच्या एक्सरिटीरियरमध्ये 3D कास्केडिं ग्रिल दिले आहे. ज्यावर मोठे LED हेडलॅम्प्ससह नवे स्पिल्ट LED डेटाइम रनिंग लॅम्प्स आहेत. याचे बंपर सुद्धा नवे असून ही एसयुवी आता फ्लोटिंग रुफ डिझाइनसह येणार आहे. यामध्ये 17 इंचाचा डायमंड कट अलॉय व्हिल्स ही पहायला मिळणार आहे.

नव्या जनरेशन मधील क्रेटाच्या इंटीरियर मध्ये 10.25 इंचाचा टचस्क्रिन डिस्प्लेसह येणार असून इन-कार कंट्रोल्स ही दिले आहेत. यामध्ये 7 इंचाचा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर ही दिला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी क्रेटामध्ये स्मार्टवॉच अॅपची कनेक्टिव्हिटी, पॅनरॉमिक सनरुफ, वेंटिलेटेड सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसारखी सुविधा दिली आहे.(Hyundai ची Santro, Grand i10, Aura कारवर ग्राहकांना मिळणार 1 लाखांपर्यंत सूट)

इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास क्रेटामध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल, 1.5 लीटरचे VGT डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन दिले आहे. डिझेल इंजिनमध्ये 1.5 लीटर U2 CRDi ऑइल बर्नर दिला गेला आहे. हे इंजिन 113bhp ची पॉवर आणि 250Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि एक 6 स्पीड ऑटोमेटिक टॉर्क कन्वर्टरसह येणार आहे. याचे पेट्रोल इंजिन 1.5 लीटर युनिट नॅच्युरली एस्पिरेट आणि 1.4 लीटर GDi इंजिनसह येणार आहे. 6 स्पीड मॅन्युअल आणि एक iVT ऑटोमेटिक ट्रान्समिशन लैस आहे. 1.5 लीटर 113bhp ची पॉवर आणि 144Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. तर स्टँडर्ड 7 स्पीड DCT पेक्षा लैस 1.4 लीटर पेट्रोल 138bhp ची पॉवर आणि 242Nm टॉर्क जनरेट करमार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Creta 11.12 लाख ते 20.38 लाख रुपये ठेवली गेली आहे.