Royal Enfield Bullet 350 New-Generation Launch Date: रॉयल एनफिल्ड बुलेट 350 या बाईकची लोकांमध्ये नेहमीच क्रेझ पाहायला मिळाली आहे. यात बुलेट 350 हे मॉडेल सर्वाधिक हिट ठरल्याचे पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर रॉयल एनफिल्ड या मॉडेलची नवी पिढी म्हणजेच न्यू जनरेशन पुढे आणत आहे. जे त्या 1 सप्टेंबर म्हणजे उद्याच लॉन्च होत आहे. नवीन बाईक हंटर 350 आणि क्लासिक 350 मध्ये स्थित असेल. हंटर 350 ही रॉयल एनफिल्ड लाइन-अपमधील सर्वात बजेट-अनुकूल मोटरसायकल आहे. एक्स-शोरूमने दिलेल्या माहितीनुसार बाईकची किंमत ₹ 1.5 लाख पासून सुरू होते. बुलेट 350 मध्ये रॉयल एनफिल्डने गेल्या वर्षी लाँच केलेले नवीन J-सिरीज इंजिन असेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी 2023 रॉयल एनफील्ड बुलेट अद्ययावत पद्धतीने साकारलेले आपले सौंदर्य दाखवण्यासाठी सज्ज आहे. उत्सुकता फार न ताणता रॉयल एनफिल्ड 1 सप्टेंबर रोजी नवीन-जनरेशन बुलेट 350 मोटरसायकल लाँच करत आहे. यामध्ये नवीन मोटरसायकल बेस, मिड आणि टॉप अशा तीन प्रकारांमध्ये सादर केली जाण्याची अपेक्षा आहे. अत्यंत नव्या रुपात नव्या दमात सेट केलेले 350cc लाँग-स्ट्रोक इंजिन 20.2 BHP पॉवर निर्माण करते. जे बुलेट 350 नवीन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले जाईल.
बुलेटप्रेमींमध्ये मनोरंजक आणि तेवढीच उत्कंटा वाढवणारी ठरलेली बाब म्हणजे कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केलेला एक टीझर. जो आणखी तीन मोटारसायकलींची नावे दर्शवितो - बुलेट 500, बुलेट इलेक्ट्रा आणि बुलेट सिक्स्टी 5. दरम्यान, BS-6 चे कठोर नियम लागू झाल्यानंतर रॉयल एनफिल्डने 2020 मध्ये बुलेट 500 बंद केली. तथापि, ही बाईक अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे.