34 वर्षांपासून रस्त्यावर धावणार्‍याओमनी कारचं उत्पादन होणार बंद, मारूती सुझूकीने दिले हे कारण...
ओमनी कार Photo Credits: Wikimedia Commons

90 च्या दशकामध्ये फॅमिली कार म्हणून लोकप्रिय असलेली ओमनी ही मारूती सुझूकीची कार आता लवकरच ग्राहकांचा निरोप घेणार आहे. मारूती 800 नंतर आता मारूती सुझूकीची गेली 34 वर्ष रस्त्यांवर धावणारी ओमनी कार 2020 नंतर भारतीय रस्त्यांवर दिसणार नाही.

ऑक्टोबर 2020मध्ये बंद होणार उत्पादन

ऑटो वेबसाईट कार अ‍ॅण्ड बाईकमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीनुसार, ऑक्टॉबर 2020 पासून भारतामध्ये न्यू व्हीकल्स सेफ्टी असेस्मेंट (BNVSAP) लागू होणार आहे. त्यानुसार मारूती ओमनीचं उत्पादन बंद होणार आहे. काही गाड्या सुरक्षेचे मापदंड पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे अशा गाड्यांचं उत्पादन बंद करावं लागणार आहे. त्यापैकी एक म्हणजे मारूती ओमनी.

(Eeco Van) आणि ऑल्टो 800 च्या काही कार्स टॅक्सीच्या स्वरूपात वापरल्या जात आहेत. या कारमध्येही सुरक्षेच्या दृष्टीने काही बदल करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

दमदार ओमनी कार

1984 साली मारूतीने ओमनी कार बाजारात आणली होती. आत्तापर्यंत ओमनी कारमध्ये दिन वेळेस बदल करण्यात आले आहेत. 1998 साली पहिल्यांदा ओमनीमध्ये बदल करण्यात आला होता. त्यानंतर 2005 साली कारच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. 3 सिलेंडर्स, 796 सीसी इंजिन, 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही कार उपलब्ध आहे.