Ola Electric Scooter New Price: ओलाने आपल्या गाड्यांच्या किंमत 25,000 ने केली कमी
Ola Electric Scooter (PC - PTI)

जर तुम्ही ई-स्कूटर घेण्याच्या विचारात असाल, तर कंपनीने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. ओलाने आपल्या S1 स्कूटरच्या रेंजमध्ये तब्बल 25,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे. या किंमती तातडीने लागू होणार असल्याचंही ओलाने स्पष्ट केलं. Ola S1X+ या मॉडेलची किंमत 1.09 लाखांवरुन 84,999 रुपये झाली आहे. Ola S1 Air मॉडेलची किंमत 1.19 लाखांवरुन 1.05 लाख रुपये झाली आहे. Ola S1 Pro या मॉडेलची किंमत 1.48 लाखांवरुन 1.30 लाख रुपये करण्यात आली आहे.  ( Kinetic E-Luna Launched in India: कायनेटिक E-Luna नव्याने लॉन्च, जाणून घ्या इलेक्ट्रिक मोपेडची किंमत, वैशिष्ट्ये आणि डिझाइन)

ओला आपल्या ग्राहकांना इतर फायनान्स ऑप्शन्स देखील देत आहे. यामध्ये झीरो डाऊन पेमेंट, नो-कॉस्ट ईएमआय, झीरो प्रोसेसिंग फी तसंच 7.99 टक्के एवढा व्याजदर अशा ऑफर्सचा समावेश आहे. ओला आपल्या S1 Air आणि S1 Pro या स्कूटरच्या बॅटरीवर तब्बल 8 वर्षे/80,000 किलोमीटर वॉरंटी देत आहे. सोबतच, ग्राहक 5,000 रुपयांमध्ये एक लाख किलोमीटर, आणि 12,500 रुपये देऊन 1.25 लाख किलोमीटरची एक्स्टेंडेड वॉरंटी देखील मिळवू शकतात.

Ola S1 Air मॉडेलची किंमत 1.19 लाखांवरुन 1.05 लाख रुपये झाली आहे. Ola S1 Pro या मॉडेलची किंमत 1.48 लाखांवरुन 1.30 लाख रुपये करण्यात आली आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.