![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/02/E-Luna.jpg)
इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) निर्मिती कंपनी कायनेटिक ग्रीनने (Kinetic Green) भारतीय वाहन बाजारात आपली शक्तिशाली मोपेड लॉन्च केली आहे. कंपनीने पुन्हा एकदा आपली लोकप्रिय आणि लीजेंड बाईक लुना लाँच केली आहे. यावेळी कंपनीने ही बाईक इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये (electric variant) लॉन्च केली आहे. Kinetic Green ने भारतीय बाजारपेठेत E-Luna लाँच केले आहे. कंपनीने नवीन लुनामध्ये काही खास फीचर्स दिले आहेत. याशिवाय या बाईकचे शुल्क प्रति किलोमीटर फक्त 10 पैसे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जर तुम्ही ही बाईक घेतली तर तुम्ही दर महिन्याला पेट्रोलच्या खर्चात 4721 रुपये वाचवू शकता. या बातमीत या मोपेडमध्ये कोणते खास फिचर्स उपलब्ध आहेत आणि ते जुन्या लुनापेक्षा किती वेगळे आहे हे जाणून घेऊया. (हेही वाचा - 'चल मेरी लूना'...! 23 वर्षांनंतर नवीन EV अवतारात सादर होणार Kinetic Luna दुचाकी, जाणून घ्या सविस्तर)
रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक एका चार्जवर 110 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते. त्याचा टॉप स्पीड 50 किमी प्रतितास आहे आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. या बाइकवर तुम्ही 150 किलोपर्यंत सामान लोड करू शकता आणि या बाइकचे वजन 96 किलो आहे. कंपनीने ही बाईक 5 कलर व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. येथे तुम्हाला हिरवा, काळा, लाल, पिवळा आणि निळा पर्याय मिळेल. ई-लुना प्रति चार्ज 110 किमी मायलेज देते आणि त्याची किंमत प्रति दिन 9.6 रुपये असेल, जी 26 दिवसांसाठी 248 रुपये असेल. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 69,990 रुपये आहे.
E-Luna ची वैशिष्ट्ये
स्टील चेसिस
हाय फोकल हेडलाइट
डिजिटल मीटर
साइड स्टँड सेन्सर
लार्ज कैरिंग स्पेस
साइड गार्ड
सुरक्षा लॉक
कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम
बॅग हुक
ग्रैब रेल
डिचेबल रियर सीट
टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन
16 इंच चाके
पुढचा पाय गार्ड
USB चार्जिंग पॉइंट