होंडा CR-V आता भारतातही उपलब्ध; 9 ऑक्टोबरला येणार बाजारात
(प्रतिकात्मक प्रतिमा, सौजन्य:hondacarindia.com)

जगप्रसिद्ध असलेली होंडा कंपनी आपली नवी कोरी गाडी CR-V भारतात लवकरच लाँच करत आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने ही गाडी भारतात लाँच करण्याबाबत विचार नक्की केला होता. या निर्णयानुसारच ऑटो एक्स्पो 2018मध्ये ही गाडी दाखवण्यात आली. दरम्यान, गेल्याच महिन्यात वृत्त आले होते की, होंडा सीआर-व्ही ही गाडी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात येईल. हे वृत्त आले त्यावेळी नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. पण, होंडाने आता ही तारीख जाहीर केली आहे. सीआर-व्ही येत्या 9 ऑक्टोबरपासून भारतात उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, होंडा सीआर-व्हीचे लेटेस्ट मॉडेल हे जुन्या गाडीच्या तूलनेत अधिक भक्कम आणि मोठे असणार आहे. या मॉडेलला दोन इंजिन ऑप्शन दिल्याचे समजते. डिझेल इंजिन असलेल्या होंडा आरसी-व्हीचे भारता प्रथम लाँचींग करण्यात येईल. ज्यात 1,6 लीटरचे यूनीट असतील. दरम्यान, होंडा ट्विन टर्बोशिवाय सिंगल टर्बोही ऑफर करण्याची शक्यता आहे.

सिंगल टर्बोवाला इंजिन 120 अश्वशक्ती आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क निर्मिती करते. हे इंजिन 9 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनयुक्त असेन.