वाहन Registration Certificate मध्ये मोठा बदल; आता Nominee ची सुद्धा माहिती द्यावी लागणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 संशोधनाचा एक प्रस्ताव ठेवला आहे. या नव्या नियमानुसार, वाहन मालकाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी करु शकणार आहे. मंत्रालयाने एका विधानात असे म्हटले की, वाहनांच्या नोंदणी वेळीच नॉमिनेशची प्रक्रिया पार पाडली जावी असा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जर एखाद्या वेळेस वाहन मालकाच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या नॉमिनीला मदत मिळणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे आणि देशभरात या बद्दल एकरुपता ही नाही आहे. तसेच आरसी बुक ते विवध फॉर्म मध्ये ही बदल करण्यासंदर्भात मत देण्याचे आवाहन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायाने केले आहे.(Car Care in Winter: थंडीच्या दिवसात गाडी उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी 'या' टिप्स जरुर लक्षात ठेवा)

यामध्ये असे ही म्हटले की, सरकारने प्रस्तालित संशोधनावर जनतेसह सर्व हितधारकांची मतांचे स्वागत केले जाईल. त्याचसोबत नॉमिनी असलेल्या व्यक्तीला आपले वैध ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. त्याचसोबत नॉमिनेचे नाव आधीपासून असेल तर वाहन मालकाच्या मृत्यूप्रकरणी पोर्टलवर त्याचे मृत्यूपत्र द्यावे लागणार आहे, त्यानंतरच नॉमिनिला ती गाडी आपल्या नावावर करण्यासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे.(बाइक आणि स्कूटरचा Insurance काढण्यापूर्वी 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नव्या नियमात रजिस्ट्रेशनवेळी वाहन मालकाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नॉमिनेचे नाव दाखल करता येणार आहे. तर एखाद्या दुर्घटनेत मालकाचा मृत्यू झाल्यास त्या संदर्भात विविध प्रक्रिया पार पाडल्या जातात. मात्र या सुविधेमुळे ते सोप्पे होणार आहे. तसेच 50 वर्ष जुन्या असलेल्या दुचाकी आणि चार वाहनांची नोंदणी सोपी करण्यासाठी विंटेज वाहनाच्या रुपात नोंदणी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अशातच वाहन मालकाला 10 वर्षांसाठी 20 हजार रुपये देऊन जुन्या गाड्यांची नोंदणी करु शकतो. नुतनीकरणासाठी 5 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.