Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

देशभरात विविध क्षेत्रात मंदीचा फटका बसला असून हजारो नागरिकांना त्यांच्या कामावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामध्येच ऑटो सेक्टर मधील सर्वात मोठी कंपनी Maruti Suzuki ला सुद्धा मंदीचा जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे कंपनीच्या कारच्या विक्रीत मोठी घट दिसून आली आहे. त्यामुळे आता विक्री वाढवण्यासाठी कंपनीकडून ग्राहकांना कार खरेदी केल्यास भरघोस सूट देण्यात येत आहे. तसेच सणादरम्यान ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी सूटच्या माध्यमातून आकर्षित करता येईल हा मुख्य उद्देश कंपनीने समोर ठेवला आहे.

मारुती कंपनीचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अॅन्ड सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी असे सांगितले की कारच्या उत्पादनात घट करण्यात आली आहे. मात्र सूटच्या माध्यमातून कारची विक्री अधिक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार,मारुती सुजुतकीच्या S-Cross कारवर 1.3 लाख रुपयापर्यंत सूट देण्यात येत आहे. तर Ciaz आणि Baleno वर क्रमश: 95 हजार व 85 हजारापर्यंत कंपनीकडून सूट देण्यात येणार आहे. मात्र सूटची ऑफर्स ही शहरानुसार बदलण्यात येणार आहे.(Maruti Suzuki मधील 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, आर्थिक मंदीचा बसणार फटका)

मानसेर आणि ग्ररुग्राम मधील प्लांट 7 आणि 9 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे या दोन दिवशी कोणत्याही पद्धतीचे कारचे उत्पादन होणार नाही आहे. कारण कारच्या विक्रीत होणारी घट पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच कारचे उत्पादन सुद्धा कमी प्रमाणात करण्यात येत आहे. तर ऑगस्ट महिन्यात मारुती कारची विक्री 32.7 टक्के कमी होऊन 1,06,413 एवढी झाली. परंतु गेल्या वर्षात कंपनीच्या कारची विक्री 1,58,189 एवढी झाली होती.