Maruti launches two new SUVs Fronx and Jimny at Auto Expo 2023

ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023) मध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने अखेर बहुप्रतिक्षित जिमनी एसयूव्ही (Maruti Jimny SUV) लॉन्च केली आहे. पाच दरवाजे असलेल्या खास एसयुव्हीबद्दल बऱ्याच काळापासून उत्सुकता होती. अखेर ही कार ग्राहकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान, लॉन्च होताच SUVचे बुकींगही सुरु झाले आहे. बाजारात आलेली ही नवी कोरी महिंद्राच्या थारला (Mahindra Thar) टक्कर देईल असे बोलले जात आहे.

मारुती जिमनीचा बाह्य भाग फार विशेष नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आगोदरपासूनच हजर असलेल्या 3 दरवाजांच्या इतर उत्पादनांप्रमाणेच या एसयुवीचा बाह्य भाग आहे. मारुती जिमनीची पुढची बाजू स्क्वेरिश बंपर आणि G-वॅगन सारखा बोनेटसारखा आणि उभ्या लोखंडी जाळीला स्लेट असल्यासारखा आहे. मिश्रधातूंपासून बनलेली या एसयुव्हीची चाके मात्र काहीशी स्पोर्टी लूक देतात. ज्यामुळे वाहनाचा दणकटपणा काहीसा अधिक वाढतो. एसयुवीच्या मागील बाजूस, टेलगेट-माउंट केलेले स्पेअर टायर पारंपारिक जीपची आठवण करून देतात.  (हे ही वाचा:- Royal Enfield Bullet Bill Viral: रॉयल एनफील्ड बुलेट फक्त  ₹ 18,700 मध्ये, 1986 चे बिल सोशल मीडियावर व्हायरल)

मारुती सुझुकी जिमनी SUV वैशिष्ट्ये

  • मारुती सुझुकी जिमनी SUV ला 5 दरवाजे आहेत
  • नवीन जिमनी एसयूव्ही मध्ये कंपनीकडून 1.5 लीटर K-सीरीज पेट्रोल असेल.जे 102 बीएचपी पॉवर
  • निर्माण करण्यास सक्षम असेल.
  • इंजिनसोबत कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पेअर केले आहे.
  • जिमनीमध्ये समर्पित वॉशरसह एलईडी हेडलाइट्स आहेत. कलर व्हेरियंटच्या बाबतीत, मारुती सुझुकी जिमनी खरेदी करण्यासाठी 7 पर्याय आहेत. त्यामुळ ग्राहक त्यांच्या आवडीनुसार खरेदीसाठी रंग निवडू शकतात.

दरम्यान, जिमनीच्या आत, एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टायलिश एसी व्हेंट्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि पार्ट-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. बाजारातील 50 टक्के हिस्सा परत मिळवणे आणि SUV सेगमेंटमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करणे हे मारुती सुझुकीचे उद्दिष्ट आहे.