मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki) ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जवळपास 63 हजार कार माघारी बोलावल्या आहेत. (Maruti Recalled Cars) या कारमध्ये पेट्रोल स्मार्ट हायब्रीड Ciaz, Ertiga आणि XL6 गाड्यांचा समावेश आहे. मारुती सुझुकीने 1 जानेवारी 2019 ते 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत बनवलेल्या सर्व कार माघारी बोलावल्या आहेत. माघारी बोलावण्यात आलेल्या कारमध्ये कंपनी व्हेइकल जनरेशन युनिटमधील कमतरतेची तपासणी करणार आहे. या कार तयार करताना एमजीयूमध्ये कमतरता राहिली आहे. त्यामुळे कंपनी यासंदर्भातील कोणताही पार्ट मोफत बदलून देणार आहे. त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे मारुती सुझुकी कंपनीने स्पष्ट केले आहे. 6 डिसेंबरपासून कंपनीने रिकॉलची प्रक्रिया सुरू केली आहे.
मारुती सुझुकीची कार असणाऱ्या ग्राहकांना यासाठी marutisuzuki.com (Important customer info tab) वेबसाइटवर जावे लागणार आहे. तेथे ग्राहकांना 14 अंकी अल्फा न्युमेरिक वाहनांचा चेसिस नंबर नोंद करावा लागणार आहे. या वेबसाइटवर तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल. (हेही वाचा - Royal Enfield लवकरच आणणार इलेक्ट्रिक मोटरसायकल)
मारुती सुझुकीने या वर्षी 21 ऑगस्ट रोजी प्रीमियम एमपीवी XL6 कार लाँच केली होती. कॅप्टन सीट असणाऱ्या या कारमध्ये 6 सीट आहेत. या कारची किंमत 9.79 लाख रुपयांपासून सुरू आहे. या अगोदर मारुती सुझुकीने 40 हजार 618 Hyundai कार रिकॉल केल्या होत्या.