लॉकडाऊनच्या काळात कार कंपन्यांचा सेल न झाल्याने आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गाड्यांवर ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. तर आता अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु झाल्यानंतर कार कंपन्या त्यांची नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी या मार्गाचा वापर करत आहेत. याच दरम्यान, आता मारुति कंपनीने सुद्धा त्यांच्या गाड्यांवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. ऑगस्ट महिन्यात ऑल्टो 800 ते एस प्रेसोसह डिजायर सारख्या कार स्वस्तात खरेदी करु शकणार आहेत.(Toyota Fortuner TRD लिमिटेड Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)
कंपनीच्या एस-प्रेसो या सर्वात छोट्या SUV वर या महिन्यात 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. यामदअये 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस डिस्काउंट आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच ऑल्टो 800 या कारवर कंपनी 18 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजारांचा सुद्धा बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या कारवर एकूण 36 हजारांपर्यंत बेनिफिट्सह डिस्काउंट मिळवता येणार आहे.(Maruti Suzuki S-Cross चे पेट्रोल मॉडेल येत्या 5 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत)
मारुतिची वेगन कारवर 33 हजारांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात स्विफ्ट आणि डिझायर या कारवर सुद्धा क्रमश: 35,000 रुपये आणि 40,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत ब्रेजा आणि अर्टिगावर सुद्धा या महिन्यात सूट मिळवू शकता. या दोन्ही कारवर 25 हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.