Mahindra Thar Earth Edition: महिंद्रा थारचे नवीन व्हर्जन लाँच, 'ही' असतील खास वैशिष्ट्य

महिंद्रा थार (Mahindra Thar) एसयूव्ही (SUV)चे आता नवीन व्हर्जन लाँच होणार आहे. कंपनी आता भारतीय बाजारपेठेत थारचं 5-डोर व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पण, त्याआधी कंपनीने 3-डोर थारचं नवीन व्हर्जन देखील सादर केलं आहे. कंपनी या कारच्या नवीन व्हर्जनला महिंद्रा थार अर्थ एडिशन (Mahinndra Thar Earth Edition) असं नाव दिलं असून ही कार पेट्रोलबरोबरच डिझेल इंजिनमध्येही उपलब्ध असेल. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश असणार आहे.  (हेही वाचा  - Ola Electric Scooter New Price: ओलाने आपल्या गाड्यांच्या किंमत 25,000 ने केली कमी)

अर्थ एडिशन बॅजसह नवीन सॅटिन मॅट कलर देण्यात आला आहे. ज्याला महिंद्रा डेझर्ट फ्युरी म्हणतात. ORVM आणि लोखंडी जाळीला आता बॉडी कलर ॲक्सेंट मिळतात. थार वाळवंट-थीम असलेली डेकल्स आणि ब्रँडिंग इन्सर्टसह अलॉय व्हीलसह येते. याशिवाय महिंद्रा आणि थार वर्डमार्क मॅट ब्लॅक कलरमध्ये आहेत.  इंटीरियरला डॅशबोर्डवर VIN प्लेट मिळते. लेदर सीट्स, बेज स्टिचिंग आणि सीट्सवर अर्थ ब्रँडिंग आणि हेडरेस्ट्सला डून डिझाईन देण्यात आले आहे.

महिंद्रा थार अर्थ एडिशनच्या पेट्रोल एमटीची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपये आहे, तर AT ची एक्स-शोरूम किंमत  16.99 लाख रुपये आहे. यानंतर, डिझेल एमटीची एक्स-शोरूम किंमत 16.15 लाख रुपये आणि त्याच्या एटी व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.40 लाख रुपये आहे.