Mahindra Electric ची नवी 3-Wheeler Treo Zor लॉन्च; पहा काय आहे खासियत आणि किंमत
Treo Zor (Photo Credits: Mahindraelectric.com)

महिंद्रा इलेक्ट्रिक (Mahindra Electric) ने आज (गुरुवार, 29 ऑक्टोबर) नव्या इलेक्ट्रिक कार्गो मॉडेल Treo Zor च्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. या तीन चाकी इलेक्ट्रिक Treo Zor ची किंमत 2.73 हजार रुपये आहे. या ट्रियो प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या मॉडेलचे तीन वेरिएंट पाहायला मिळतील. पिकअप डिलिव्हरी व्हॅन आणि फ्लॅट बेड अशी या वेरिएंटची नावं आहेत. मोजक्याच शहरांमध्ये महिंद्राच्या सर्व कर्मशियल डिलर्सकडे डिसेंबरपासून हा मॉडेल उपलब्ध होईल.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मेक इन इंडिया ला साथ देण्यासाठी आम्ही आमचे Treo platform लॉन्च केलं आहे. Treo Zor च्या मदतीने डिलिव्हरी करण्यासाठी अगदी सोयीस्कर, प्रदूषण नसलेले आणि माफक दरात वाहन उपलब्ध होईल, अशी माहिती महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे एमडी आणि सिईओ पवन गोईंका यांनी लॉन्च दरम्यान दिली. तसंच महिंद्राची ही नवी 3 व्हिलर अत्याधुनिक टेक्निकच्या आधारे बनवली असून ग्राहकांच्या गरजेनुसार ही तीन वेगवेगळ्या वेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिंद्राची ही नवीन इलेक्ट्रीक 3 व्हिलरला प्रत्येक किमी मागे केवळ 40 पैसे खर्च येतो. डिझेल कार्गो 3 व्हिलरच्या तुलनेत याचा मेइन्टनन्स कमी असल्यामुळे वर्षभरामध्ये 60 हजार रुपयांची बचत होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

Treo Zor मध्ये 8 किलो व्हॅटची आधुनिक लिथियम बॅटरी दिली आहे. या गाडीचा वापर करुन ग्राहक अधिकाधिक कमाई करु शकतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. या गाडीसोबत तुम्हाला तीन वर्षांपर्यंतचे किंवा 80,000 किमी पर्यंतचे वॉरंटी मिळेल. ही गाडी एका 15AMP च्या सॉकेटमधून सुद्धा चार्ज करता येईल.

देशभरातील वेगवेगळ्या 140 डिलर्स गाडीच्या विक्रीनंतर सुद्धा वेळोवेळी सर्व्हिस देणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या गाडीमध्ये GPS, windscreen आणि wiping system, spare wheel provision देण्यात येणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.