Lightyear One (Photo Credit : Youtube)

कार उत्पादक कंपनी लाइटइयर (Lightyear) ने सोलर पॉवर (Solar Power) वर चार्ज होणारी पहिली लॉन्ग रेंज कारचे प्रोटोटाइप सादर केले आहे. कंपनीने या गाडीला ‘लाइटइयर वन’ (Lightyear One)असे नाव दिले आहे. कंपनीने दावा केला आहे की, सूर्यप्रकाशात पूर्ण चार्ज केल्यावर ही गाडी तब्बल 725 किमी पर्यंत चालू शकेल. कंपनीने यामध्ये सोलर एनर्जी द्वारे चार्ज होणारी बॅटरी आणि टेक्नॉलॉजी वापरली आहे. त्याचबरोबर, ही गाडी विजेवरही चार्ज केली जाऊ शकणार आहे.

लाइटइयर वनच्या छतावर 5 स्क्वेअर मीटर चे सोलर पॅनेल बसवले आहेत, ज्यांच्यावर सेफ्टी ग्लास लावले आहेत. कंपनीच्या मते ही ग्लास इतकी मजबूत आहे की, यावर कोणी उभे राहिले तरी ती दाबली जाणार नाही. हे सोलर पॅनेल लाइटवेट असूनही, वेगवान शक्ती निर्माण करण्यास सक्षम आहेत. 1 तास बॅटरी चार्ज केल्यावर 12 कि.मी.चा प्रवास घडू शकतो. याला तुम्ही 230V प्लगद्वारेही चार्ज करू शकता. रात्रभर चार्जिंग केल्यास गी गाडी 400 किमी पर्यंत धावू शकेल. ही कार जेव्हा उन्हात चालवली जाते तेव्हा या बॅटऱ्या आपोआप चार्ज होतात. (हेही वाचा: आजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर)

5 लोक बसतील इतकी क्षमता असलेल्या लाइटइयर वनची किंमत 135,000 डॉलर (जवळपास 94 लाख रुपये) इतकी आहे. कंपनीची सध्या अशा 500 कार तयार करण्याची योजना आहे. 2021 पासून या कारची विक्री सुरू होईल. ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन वापरले नसल्याने त्यामुळे प्रदूषण होत नाही. या कारचा मेंटेनन्स खर्च खूपच कमी आहे.