EV6 साठी Kia India कडून बुकिंग सुरू; देशात यंदा उपलब्ध होणार केवळ 100 युनिट्स
Kia EV6 (Photo Credits: Kia India)

Kia India कडून आज (26 मे) देशातील पहिली इलेक्ट्रिक कार मॉडेल EV6 साठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅट्फॉर्म E-GMP वर EV6 बनवण्यात आली आहे. या कारच्या माध्यमातून भारतामध्ये Kia त्यांच्या इलेक्ट्रिक कार्सच्या प्रवासाला सुरूवात करत आहे.

भारतामध्ये Completely Built Unit प्रकारामध्ये यंदाच्या वर्षी केवळ 100 युनिट्स EV6 उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे इम्पोटेड मॉडेल भारतामह्ये पुढील आठवड्यामध्ये लॉन्च केले जाणार आहे. EV6 ही कार 3 लाख रूपयांच्या टोकन वर बूक करता येणार आहे. देशात 12 शहरांमध्ये आणि 15 निवडक डिलरशीप कडे ही कार उपलब्ध असणार आहे. Kia India च्या वेबसाईट द्वारा देखील ही कार बूक करता येऊ शकते.

भारतामध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रात बदल होत आहेत आणि Kia या बदलांमध्ये अग्रस्थानी असल्याची माहिती देण्यात आली आहे. जारी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, सिंगल फूल चार्ज मध्ये ही इलेक्ट्रिक कार 528 किमी धावणार आहे. 350KWh चार्जरच्या माध्यमातून 18 मिनिटामध्ये 10-80% गाडी चार्ज होऊ शकते. ही कार ऑल व्हिल ड्राईव्हच्या माध्यमात आहे. पॅनरॉमिक सनरूफ आहे. मल्टिपल ड्राईव्ह मोड आहे. फॉर्वर्ड कोलिजन अव्हॉईडन्स असिस्ट आहे. लेन कीप असिस्ट सह 60 कनेक्टेट फीचर्स आहेत. नक्की वाचा: Mumbai: आता अन्न कचऱ्यापासून निर्मित विजेवर चार्ज होणार Electric Vehicles: मुंबईमध्ये उभा राहिले भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन.

भारतामध्ये आता इलेट्रिक गाड्या विकत घेण्याकडे  ग्राहकांचा ओढा वाढत आहे. वाढते पेट्रोल दर, इंधनाचा तुटवडा आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार आणि बाईक घेण्यासाठी सरकारी पातळीवरूनही प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारकडूनच आता अनेक मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र देखील उभारण्याचं काम सुरू आहे.