गाडी खरेदी करण्यासाठी हाच उत्तम वेळ, कंपन्या देतायात बंपर डिस्काउंट
Image used for representational Automobile Sector Crisis | Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

2019 चे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स दिल्या जात आहेत. 5 टक्क्यांपासून ते 15 टक्क्यांपर्यंत सुट नव्या कार खरेदीवर दिली जात आहे. इंडस्ट्रीचे तज्ञ असे म्हणतात की, जानेवारी महिन्यापासून गाड्यांचे दर वाढणार आहेत. कारण नव्या गाड्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे.

कार बनवणाऱ्या कंपन्यांचे निर्माता त्यांच्या जुन्या मॉडेलमधील गाड्या स्टॉक मधून काढत आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांना गाडी खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मारुती सुझुकीचे एक्झिक्युटिव्ह शशांक श्रीवास्तव यांनी असे म्हटले की, आम्हाला आमचा BSIV स्टॉक पुर्णपणे विकला आहे. ज्या मॉडेल्सवर सूट दिली जात आहे ज्यांचा स्टॉक राहिला आहे. याच कारणामुळे जानेवारी महिन्यापासून दर वाढवले जाणार आहेत. असे सांगितले जात आहे की, डिसेंबर महिन्यात गाड्यांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र सध्या बहुतांश लोक बीएस-6 स्टॅन्डर्ड पद्धतीच्या गाड्या कधी लॉन्च होणार याची वाट पाहत आहेत. असे ही सांगितले जात आहे की, देशात सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा फटका बसल्याने निर्मात्यांकडून मार्केट मध्ये गती आणण्यासाठी भारी सूट देत आहेत.(खुशखबर! डिसेंबर महिन्यात Honda च्या कारवर तब्बल 5 लाख, तर Hyundai च्या गाडीवर 2 लाखांची सवलत; जाणून घ्या ऑफर)

 या महिन्यात तुम्हाला ह्युंदाई (Hyundai Motor India) आणि होंडा (Honda) कारवर भारी सूट मिळू शकते. ह्युंदाई आपल्या कारवर 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत देत आहे, तर होंडाच्या कारकार 5 लाखांपर्यंत सवलत मिळत आहे. या सवलतीत कॅश बोनस, एक्सचेंज बोनस आणि एक्सटेंडेन्ट वॉरंटीसारखे फायदे मिळणार आहेत.  तर ह्युंदाई कंपनी आपल्या एंट्री लेव्हल हॅचबॅक सॅंट्रोवर (Santro) 55,000 रुपयांची सूट देत आहे. ओल्ड जनरेशन ग्रँड आय 10 आणि त्याच्या प्राइम मॉडेल्सवर 75,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे. तर ग्रँड आय 10 निओसवर (i10 Nios) 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सवलत दिली जात आहे. सोबत एक्सेंट (Xcent) कॉम्पॅक्ट सेडानमध्ये 95,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे