खुशखबर! डिसेंबर महिन्यात Honda च्या कारवर तब्बल 5 लाख, तर Hyundai च्या गाडीवर 2 लाखांची सवलत; जाणून घ्या ऑफर
Honda CR-V (संग्रहित संपादित प्रतिमा)

वर्षाच्या अखेरीस, अनेक मोठे कार उत्पादक ब्रँड त्यांच्या कारवर सवलत देत आहेत. म्हणजेच, दिवाळी किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण जर कार विकत घेतली नसली, तर या महिन्यात कार घेण्याची एक उत्तम संधी आपणास मिळत आहे. या महिन्यात तुम्हाला ह्युंदाई (Hyundai Motor India) आणि होंडा (Honda) कारवर भारी सूट मिळू शकते. ह्युंदाई आपल्या कारवर 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत देत आहे, तर होंडाच्या कारकार 5 लाखांपर्यंत सवलत मिळत आहे. या सवलतीत कॅश बोनस, एक्सचेंज बोनस आणि एक्सटेंडेन्ट वॉरंटीसारखे फायदे मिळतील.

ह्युंदाईच्या कारवर सूट -

ह्युंदाई कंपनी आपल्या एंट्री लेव्हल हॅचबॅक सॅंट्रोवर (Santro) 55,000 रुपयांची सूट देत आहे. ओल्ड जनरेशन ग्रँड आय 10 आणि त्याच्या प्राइम मॉडेल्सवर 75,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे. तर ग्रँड आय 10 निओसवर (i10 Nios) 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सवलत दिली जात आहे. सोबत एक्सेंट (Xcent) कॉम्पॅक्ट सेडानमध्ये 95,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

एलिट आय 20 (Elite i20) च्या एरा आणि मॅग्ना ट्रिमवर 35,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. इतर  ट्रिमवर 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. एलिट आय 20 अ‍ॅक्टिव्हवर 25,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर ह्युंदाई वर्नां 60,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल.

ह्युंदाईच्या क्रेटावर 95,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही सवलत फक्त 1.6 लिटर डिझेल ट्रिमवर उपलब्ध आहे. जुनी एलेंट्रा आणि टक्सन सध्या दोन लाखांच्या सवलतीत उपलब्ध आहेत.

होंडा कार्सवर सूट -

सीआर-व्ही (CR-V) वर पाच लाख रुपयांपर्यंतची सूट

होंडाकडून या महिन्यात सीआर-व्ही वर 5,00,000 रुपयांची बम्पर सूट मिळत आहे. कंपनीची एंट्री लेव्हल अमेझ सेडान 42,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. प्रीमियम हॅचबॅक जाझवर 50,000 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय डब्ल्यूआर-व्ही (WR-V)  क्रॉसओव्हर 45,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. (हेही वाचा: Hyundai ने 16,409 गाड्या ग्राहकांकडून परत मागवल्या कार, गाड्यांमध्ये आहे 'हा' प्रॉब्लेम)

होंडा सिव्हिकवर अडीच लाखांपर्यंत सूट

जिथे बीआर-व्हीवर (BR-V) 1,10,000 रुपयांची जोरदार सूट मिळत आहे, तर होंडा सिव्हिकवर 2,50,000 रुपयांपर्यंत जोरदार सवलत मिळत आहे. सी सेगमेंट होंडा सिटी या महिन्यात 62,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे.

अशाप्रकारे डिसेंबर महिन्यात ह्युंदाई आणि होंडा कंपन्या आपल्या विविध गाड्यांवर भरघोस सवलत देत आहेत.