GMC ने एक व्हिडिओ जाहीर केला असून त्यात Hummer EV प्रोटोटाइन आपल्या लॉन्च कंट्रोल मोडचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. याला वट्स टू फ्रीडम (WTF) असे म्हटले जाते. हा मोड पिकअप ट्रकच्या अॅडिशन वनमध्ये स्टँडर्ड फिचरच्या रुपात ऑफर केला जाणार आहे. हे इलेक्ट्रिक वाहन ट्राय मोटर पॉवरट्रेनला आणखी पॉवर देणार असून जी 1,000hp ची शक्ति उत्पादन करण्यास सक्षम असणारआहे. जीएमसी एकूण तीन सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग पकडण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
जेव्हा एखाद्या मोडची निवड केली जाते तेव्हा EV चे इंटीरियर लॉन्च होण्यापूर्वी काउंटडाउन केबिन प्रमाणे दिसणार आहे. इंटरॅक्टिव्ह नियंत्रण, बोस ऑडिओ सिस्टिमच्या माध्यमातून चालवली जाणारी युनिक साउंड आणि ऑन-स्क्रिन अॅनिमेशन सारखी प्रक्रियांच्या श्रृखंलेसह ड्रायव्हरला पुढील निर्देशन दिले जाणार आहे. यानंतर एअर संस्पेशन याच्या गुरुत्वाकर्षणाच्या केंद्राला कमी करण्यासाठी EV ची उंची लगेच कमी करणार आहे. नंतर ड्रायव्हरला त्याचे ब्रेक सोडण्यास निर्देशित केले जाणार आहे.(अपडेटेड इंजिनसह CFMoto 650NK लॉन्च, जाणून घ्या खासियत)
GMC Hummer EV ची तीन इलेक्ट्रिक मोटर 800V GM च्या अल्टियम बॅटरी बॅकसोबत जोडली आहे. इलेक्ट्रिक ट्रकमध्ये लावण्यात आलेले हे अल्टियम ड्राइव्ह सिस्टिम 830hp ची पॉवर आणि 15592Nm चा टॉर्क जनरेट करु शकते. जीएमसीने असे सुद्धा म्हटले की, ईवी एकदा चार्ज केल्यानंतर 482 किमी पेक्षा अधिक रेंज देऊ शकते.