CFMoto 650NK (Photo Credits-Twitter)

CFMoto ने भारतात आपली नवी 650cc मोटरसायकल आणि 650NK नेक्ड स्ट्रिट फायटर मोटरसायकल लॉन्च केली आहे. या मोटरसायकलची सुरुवाती किंमत 4.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मोटरसायकल बीएस6 इंजिनसह मार्केटमध्ये उतरवण्यात आली आहे. नव्या मोटरसायकल बद्दल बोलायची झाल्यास बीएस-4 स्पेक मॉडेलच्या तुलनेत 30 हजार रुपयांनी अधिक त्याची किंमत आहे. कंपनीने आपली अधिकृत डीलरशीपवर नव्या मॉडेलची बुकिंग आणि टेस्ट राइड सुद्धा सुरु केली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना ही मोटरसायकल खरेदी करायची आहे त्यांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 5 हजार रुपयांचे टोकन देऊन ती बुक करु शकता. कंपनीचे सध्या भारतात पाच डिलरशिप आहे.

नव्या बीएस6 कम्प्लायंट पॉवरट्रेनचे आउटपुट हे आधीपेक्षा कमी असणार आहे. यामध्ये 649.3cc, इन-लाइन द्विन इंजिन लावले आहे. जे 8250rpm वर 56bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 7,000rpm वर 54.4Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. जर जुन्या BS-4 कम्प्लायंट इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास ते 9,000rpm वर 61hp ची मॅक्सिमम पॉवर आणि 7,000rpm वर 56Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे.(Maserati MC20 ची बुकिंग सुरु, जाणून घ्या फिचर्ससह खासियत)

मोटरसायकलवर हार्डवेअर किटला नव्या बीएस-6 मॉडेलसाठी दिले आहे. या प्रकारे यामध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रियर-मोनो शॉकसह एकच संस्पेशन किटची सुविधा दिली आहे. ब्रेकिंगसाठी यामध्ये पुढील बाजूस द्विन रोटार, पाठील बाजूस सिंगल डिस्क आणि डुअल चॅनल ABS दिले आहे. नव्या CF 650Nk व्यतिरिक्त कंपनीने भारतात नवी 650MT आणि 650GT बाइक लॉन्च करण्याची सुद्धा घोषणा केली आहे. या दोन्ही मशीनला नवे बीएस-6 अनुपाल असणारे पॉवरट्रेसनसह अपडेट केले आहे.