Maserati mc20 (Photo Credits-Facebook)

भारतीय बाजारात नेहमीच परदेशातील कार आणि बाइक्सचा उत्तम प्रतिसाद मिळतो. याच कारणामुळे काही परदेशातील वाहन निर्मात्या कंपन्या आपल्या एकापेक्षा एक अधिक उत्तम कार आणि बाइकची लॉन्चिंग करत असतात. याच पार्श्वभुमीवर इटली येथील आलिशान वाहन निर्माती कंपनी Maserati यांनी आपली MC20 कार लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. ही कार कंपनीने गेल्या वर्षात सप्टेंबर मद्ये ग्लोबली झळकवली होती. कंपनीने आता या कारसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. असे मानले जात आहे की, भारतात सुद्धा ही लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

मीडिया रिपोट्सनुसार, भारतात Maserati MC20 कारची डिलिव्हरी पुढील वर्षात फेब्रुवारी 2022 च्या आसपास सुरु होऊ शकते. या कारची ते पहिली युनिट असू शकते. दरम्यान, भारतीय बाजारात कंपनी आपली Ghibli, Levante आणि Quattroporte सारख्या स्पोर्ट्स कार आधीपासूनच विक्री करत आहेत.(Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी MG घेऊन येणार खास फिचर्स असणारी नवी SUV)

Maserati MC20 स्पोर्ट्स कारचे डिझाइन याच्या जुन्या मॉडेल Maserati MC12 पासून प्रेरित आहे. नवी Maserati MC20 मध्ये V6 इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन मोडेना मध्ये Maserati द्वारे डेव्हलप करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आपल्या या कारसाठी पेटेंट एफ1 तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये प्री-कंबशन चेंबरची सुविधा दिली आहे.

कंपनीच्या Maserati MC20 मध्ये 3.0 लीटरचे इंजिन दिले आहे. जो 622 बीएचपीची पॉवरवर 730 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, गिअरबॉक्स बद्दल बोलायचे झाल्यास या आलिशान स्पोर्ट्स सेडान कारमध्ये 8 स्पीड डीसीटी गिअरबॉक्सचा वापर केला आहे. याचे इंजिन पाठीमागच्या बाजूला असलेल्या चाकांना पॉवर देतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही प्रीमियम स्पोर्ट्स कार एकूण 2.9 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडते. याची टॉप स्पीड 325 किमी आहे.