Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी MG  घेऊन येणार खास फिचर्स असणारी नवी SUV
MG Motors (Photo Credits: Facebook)

MG Motor India भारतात आणखी एक नवी एसयुवी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या एसयुवीची टक्कर ह्युंदाई क्रेटा सोबत होणार आहे. कंपनी ही कार एमजी एस्टर (MG Astor) नावाने लॉन्च करु शकते. ही एसयुवी भाराता लॉन्च झालेल्या MG ZS EV चे पेट्रोल वर्जन असणार आहे. कंपनी ही कार वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत लॉन्च करणार आहे. एमजी एस्टर ही Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun सारख्या कारला भारतात टक्कर देणार आहे. या कारचे डिझाइन लॅग्वेज अत्यंत MGZS EV सारखेच असणार आहे. कारमध्ये 3D स्पोक्ड ग्रिल ऐवजी हेक्सागोनल शेपमध्ये ग्रिल्स दिले जाणार आहे.

कंपनीची ही काप भारतात लॉन्च झालेल्या एमजी झेडएस ईवीचे पेट्रोल वर्जन असणार असून ती 419 km ची रेंज देणार आहे. सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर न थांबता 419 किलोमीटर पर्यंत अंतर कापू शकते. यामध्ये UAES ची पॉवर इलेक्ट्रॉनिक सॉल्यूशन दिले आहे. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 8.5 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग पकडते.(Tesla च्या सर्वाधिक स्वस्त कारची भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग सुरु, ड्रायव्हिंग रेंजसह किंमतीबद्दलचा वाचा रिपोर्ट)

कंपनीने दावा केला आहे की, स्टँडर्ड एसी चार्जकच्या मदतीने ही इलेक्ट्रिक एसयुवी 6 तासात पूर्णपणे चार्ज होणार आहे. तर 50kW डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही एसयुवी अवघ्या 50 मिनिटात 80 टक्के चार्ज होते. भारतीय बाजारात याची सुरुवाती दिल्ली एक्स शोरुम किंमत 20.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच्या टॉप अॅन्ड वेरियंटसाठी 24.18 लाख रुपये किंमत ठेवली जाऊ शकते. दरम्यान, कंपनीने या वर्षाची सुरुवात Hector च्या फेसलिफ्ट मॉडेल पासून केली होती.