High-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)
Driverless High-Speed Futuristic Pods (Photo Credits: CNN)

जगभरातील अनेक शहरांमध्ये 'ट्रॅफिक' ही फार मोठी समस्या आहे. कोविड-19 च्या आधी रस्त्यावरील रहदारी ही आपल्या सर्वांच्याच जीवनातला एक हिस्सा होता. ही महामारी संपल्यानंतर जेव्हा लोकांचे जीवन सुरळीत होईल, कदाचित तेव्हाही अशा रहदारीचा सामना करावा लागू शकतो. सध्या जगभरातील अनेक कंपन्या रहदारीची समस्या सोडवण्याचा विचार करीत आहेत. काहीजण एआय-एनेबल ट्रॅफिक लाईटची (AI-Enabled Traffic Lights) ची योजना आखत आहेत तर काहींनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार विकसित केल्या आहेत. परंतु बेलारूस येथील 'युस्काय ट्रान्सपोर्ट' (uSky Transport) कंपनीचा विश्वास आहे की, या रहदारीच्या समस्येवर उपाय म्हणजे ड्रायव्हरलेस हाय-स्पीड पॉड्सचे (Driverless High-Speed Pods) जाळे तयार करणे जे शहरभर पसरलेले असेल.

एनएनच्या अहवालानुसार, जून 2021 मध्ये, युस्काय ट्रान्सपोर्टने शारजाहमध्ये फ्यूचरिस्टिक हाय-स्पीड पॉड्सची चाचणी घेण्यासाठी 400 मीटर टेस्ट लाइन सुरु केली आहे. हे पॉड्स इलेक्ट्रिक असून, छोटी-ग्लॉसी वाहने आहेत. आतून ही छोटी वाहने एखाद्या हाय-क्लास एअरलाइन्स सूटसारखे दिसतात. यामध्ये लाउंज म्युझिक, फ्लोर-टू-सीलिंग विंडो आणि मूड लाइटिंगचा समावेश आहे. या वर्षाच्या शेवटी, कंपनीने शारजाहमध्ये 2.4 किलोमीटर लाइन तयार करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे प्रवासी पॉड अधिक वेगाने चालवता येईल. (हेही वाचा: बॅटरी आणि पॅडलच्या जोरावर चालतात 'या' सायकल, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक)

हाय-स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की, यामधून  चार प्रवासी आरामात प्रवास करू शकतात. या व्यतिरिक्त, यामध्ये दोन पॅडेड आर्मचेअर्स आणि दोन फोल्डेबल सीट देखील आहेत. शहरभर अशा पॉडचे जाळे पसरले तर, तासाला साधारण 10,000 प्रवासी प्रवास करू शकतात. 'युस्काय ट्रान्सपोर्ट' म्हटले आहे की, या पॉड्सचा एक किलोमीटर सबवे तयार करण्यासाठी सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स खर्च येऊ शकतो.