नाहक मोटर्सने या जुलै महिन्यात आपल्या दोन इलेक्ट्रिक सयकल भारतात लॉन्च केल्या आहेत. याची नावे गरुड आणि जिप्पी अशी आहेत. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये रिमुवेबल बॅटरी, एलसीडी डिस्प्ले आणि पॅडल सेंसर टेक्नॉलॉजी सारखे फिचर्स दिले आहेत. या इलेक्ट्रिक सायकल खासकरुन भारतीय हवामानाला अनुसरुन डिझाइन करण्यात आल्या आहेत.यामध्ये लिथियम आर्यन बॅटरी दिली गेली आहे. जी फुल चार्ज होण्यासाठी 3 तासांचा वेळ घेते. घरात असलेल्या साध्या पॉवर सॉकेटमध्ये याचे चार्जर अगदी सहज फिट होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक सायकल 40 किमी पर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे.
जिप्पी (Zippy) आणि गरुड (Garuda) इलेक्ट्रिक सायकलमध्ये अलॉय स्टिल फ्रेम दिली गेली आहे. कंपनीने दावा केला आहे की, या इलेक्ट्रिक सायकलवक ग्राहकांना कमीतकमी 10 पैसे प्रति किलोमीटर द्यावे लागणार आहे. या इलेक्ट्रिक सायकलची बॅटरी आणि पॅडलच्या माध्यमातून चालवली जाणार आहे. म्हणजेच बॅटरी संपल्यानंतर तुम्ही साधारण सायकल प्रमाणे ती चालवू शकता.(Vintage Motor Registration : व्हिंटेज कारचा वारसा जपण्यासाठी वाहनांची नोंदणी सुरू, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती)
भारतीय बाजारात गरुड इलेक्ट्रिक सायकलची किंमत 31,999 रुपये आहे. तर जिप्पी इलेक्ट्रिक सायकलची किंमत 33,499 रुपये आहे. तर Nexzu Mobility ने यंदाच्या वर्षात एप्रिल महिन्यात आपली नवी इलेक्ट्रिक सायकल Roadlark भारतात लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक सायकल 100 किी रेंज देते. बॅटरी संपल्यानंतर ही सुद्धा पेडलच्या माध्यमातून चालवता येणार आहे.
ही इलेक्ट्रिक सायकल मेड इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आली आहे. यामध्ये डु्अल बॅटरी सिस्टम दिली गेली आहे. यामध्ये 8.7 चा हलका आणि रिमूवेबल बॅटरी दिली आहे. यामध्ये 5.2Ah ची सेकेंडरी इन फ्रेम बॅटरी सुद्धा मिळणार आहे.