Hero कंपनीची नवी धमाकेदार ऑफर, अर्ध्या किंमतीत खरेदी करा नवी स्कूटर
Hero MotorCorp Logo Photo Credits: Wiki Commons

घरातील रोजच्या गरजेच्या वस्तू, मोबाईल ह्यावर दरदिवसा नवीन ऑफर्स, एक्सचेंज ऑफर ऐकायला मिळतच असतात. मात्र आता त्यात भर म्हणजे देशातील नावाजलेली टू-व्हिलर कंपनी हीरो मोटोकॉर्प(Hero MotoCorp) ने चक्क बायबॅक स्कीम ठेवली आहे. ह्या ऑफरमध्ये तुम्ही तुमची जुनी बाइक अथवा स्कूटर ह्या कंपनीला विकून त्या बदल्यात कंपनीकडून जुन्या बाइक किंवा स्कूटरच्या किंमतीच्या 57 ते 65 टक्के रक्कम परत मिळेल .

भारतीय बाजारात अशाप्रकारची ही पहिलीच ऑफर असल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांना नवीन स्कूटर(Scooter) आणि मोटारसायकल खरेदी केल्यांनतर CredR कडून एक बायबॅक प्रमाणपत्र दिले जाईल. याचा वापर स्कूटर खरेदी केल्याच्या 6 महिन्यानंतर आणि पाच वर्षांपर्यंत करता येईल. खरेदी केलेली हिरोची नवी स्कूटर जर तुम्ही पाच वर्षांच्या आत कंपनीकडे विकायला गेल्यास तुम्हाला एक्स शोरूम किंमतीवर 60 टक्क्याप्रमाणे जवळपास 30 हजार रूपये परत केले जातील. म्हणजेच ग्राहकाला ती स्कूटर केवळ 20 हजार रूपये मोजावे लागतील.

Hero XPulse 200, XPulse 200T आणि Xtreme 200S भारतात लॉन्च; पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत

या स्कीममुळे Destiny आणि Pleasure मॉडलच्या विक्रीत वाढ होईल. कंपनीने हा निर्णय दुचाकीची कमी झालेली मागणी वाढवण्यासाठी घेतला आहे, अशी माहिती हिरो मोटोकॉर्पचे हेड मार्केटिंग सेल्स संजय भान यांनी दिली.