कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फोर्ड इंडियाने BS6 इंजिनसह आपली नवी इकोस्पोर्ट्स कार भारतात लाँच केली आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यात 1 लीटरच इकोबूस्ट इंजिन बंद केलेले आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. BS6 इंजिनच्या पेट्रोल आवृत्तीतल्या मॉडलची किंमत 8.04 लाख रुपये इतकी आहे. तर BS4 इंजिनच्या मॉडलची किंमत 7.91 लाख रुपयांच्या घरात आहे. याचाच अर्थ इकोस्पोर्टच्या या नव्या मॉडलची किंमत 13 हजार रुपयांनी वाढली आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल इंजिन 15.9 किमी प्रतिलीटर मायलेज देत आहे. डिझेल इंजिन 21.7 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते. BS6 डिझेल इंजिनसह येणा-या नव्या इकोस्पोर्ट्समध्ये 1.5 लीटर TDCi डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जे 100PS पॉवर आणि 215Nm चा टॉर्क निर्माण करतं. तसेच BS6 पेट्रोल इंजिनच्या नव्या इकोस्पोर्टसमध्ये 3 सिलेंडरसह 1.5 लीटर Ti-VCT पेट्रोल इंजिन बसविण्यात आलं आहे, जे 122 PS ची पॉवर आणि 149Nm चं टॉर्क निर्माण करतं.
हेदेखील वाचा- Hyundai Kona बनली जगात सर्वाधिक उंचीवर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही; गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
या इकोस्पोर्ट्सच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे असेल तर, यात पेट्रोल इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. या इकोस्पोर्ट्समध्ये पहिल्यासारखंच एक्सटिरियर आणि इंटीरियरची झलक पाहायला मिळणार आहे. तसेच या कार मध्ये सनरुफचा पर्यायही देण्यात आला आहे.
या बसणा-या प्रवाशाच्या सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. यात SYNC 3 इंफोटेन्मेंट सिस्टम, 8 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे.