इटलीची वाहन निर्माती कंपनी डुकाटी ने ऑल न्यू मल्टीस्ट्राडा 950S भारतात लॉन्च केली आहे. अत्यंत आकर्षित लूकसह दमदार इंजिन लैस ही बाईक BS6 वर्जनमध्ये उपलब्ध करुन दिली गेली आहे. याची किंमत 15.49 लाख एक्स शो रुम किंमतीत खरेदी करता येणार आहे. या बाईकसाठी काही प्रमुख शहरात बुकिंग ही एका आठवड्यापूर्वी 1 लाख रुपयांपासून सुरु झाली आहे.(Ducati ची दमदार बाइक Multistrada 950 S चे बुकिंग सुरु, येत्या 2 नोव्हेंबरला होणार लॉन्च)
या मोटारसायकलमध्ये कंपनीने 937cc द्विन सिलेंडर टेस्टास्ट्रेटा इंजिनचा वापर केला आहे. जी 9000Rpm वर 113bhp ची पॉवर आणि 7750Rpm वर 96Nm टॉर्क जनरेट करणार आहे. डुकाटी इंडियाचे प्रबंध निर्देशक बिपुल चंद्रा यांनी असे म्हटले आहे की, मल्टीस्ट्राडा भारतीय बाजारात अधिक लोकप्रिय आहे. लॉन्ग ड्राइव्हसाठी ही बाइक उत्तम असून ग्राहकांच्या सुद्धा पसंदीस पडली आहे. मल्टीस्ट्राडाच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या दृष्टीकोनातून अत्यंत शानदार बाईक आहे.(Maruti Diwali Offers: या दिवाळीत मारुती कारच्या खरेदीवर मिळवा तब्बल 55 हजारांपर्यंत सूट; वाचा सविस्तर)
It is time to hop in the saddle and explore #AWholeNewWorld with the #Multistrada950S. pic.twitter.com/FxGa474zTE
— Ducati India (@Ducati_India) November 2, 2020
मल्टीस्ट्राडा 950S मध्ये काही जरुरी बदल करत त्याला अधिक उत्तम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये फुल LED हेडलाइट, 5 इंचाचा फुल कलर टीएफटी डिस्प्ले, बॅकलिट हँडलबार कंट्रोल, हँड्स फ्री सिस्टिम, रायडर नेविगेशन, क्विक शिफ्टर आणि क्रुज कंट्रोल सारखे फिचर्स मिळणार आहेत. या व्यतिरिक्त बाईकच्या इलेक्ट्रॉनिक पॅकेजबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये Bosch कॉर्नरिंग ABS, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, व्हेडिकल होल्ड कंट्रोल, सेमी अॅक्टिव्ह डुकाटी स्कायहुक सस्पेंशन, डुकाटी क्विक शिफ्ट अप/डाउन, डुकाटी कॉर्नरिंग लाइट सारखे अन्य फिचर्स ही मिळणार आहेत.