Ducati ची दमदार बाइक Multistrada 950 S चे बुकिंग सुरु, येत्या 2 नोव्हेंबरला होणार लॉन्च
Ducati Multistrada 950 S (Photo Credits-Twitter)

2020 Ducati Multistrada 950 S Bookings: इटलीची आलिशान मोटरसायकल निर्माती डुकाटी इंडियाने भारतात आपली Multistrada 950 ची बुकिंग सुरु केली आहे. जर तुम्ही प्रीमियम बाइक बुकिंग करण्याचा विचार करत असल्यास, 1,00,000 रुपये देत कंपनीची डिलरशीप किंवा अधिकृत वेबसाइटवरुन तपासून पाहू शकता. Multistrada 950S मोटरसायकल भारतात 2 नोव्हेंबर 2020 ला लॉन्च केली जाणार आहे.(Car Subscription Service: महाराष्ट्रातील 'या' शहरामध्ये Maruti Suzuki ने सुरु केली कार सबस्क्रिप्शन सेवा; जाणून घ्या काय आहे योजना)

नवी डुकाटी मल्टीस्ट्राडा 950 एस मध्ये 937 सीसी चे एल-द्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. ज्याची पॉवर आणि टॉर्कचे आकडे आतापर्यंत समोर आलेले नाहीत. मात्र अंदाज लावू शकता की यामध्ये कंपनी कोणताही खास बदलाव करणार नाही आहे. सध्या ही मोटार 111bhp ची पीक पॉवर आणि 96Nm चे टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याचसोबत यामध्ये ट्रान्समिशन ड्युटीसाठी 6 स्पीड गिअरबॉक्सचा वापर केला जाणार आहे. तसेच यामध्ये क्विक शिफ्टर दिला जाऊ शकतो.(Renault Festive Discount Offers: रेनॉल्ट कंपनीच्या कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक)

सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अपडेट केलेले मॉडेल मध्ये काही हलके कॉस्मेटिक बदल केले आहेत. याचे वजन अधिक असणार आहे. तसेच कंपनी यामध्ये कास्ट अलॉय किंवा स्पोक व्हिल्सचा वापर करु शकते. ज्यामध्ये 19 इंचाचा फ्रंट व्हिल दिला गेला आहे. अन्य फिचर्ससाठी 5 इंचाचा फुल कलर टीएफटी डिस्प्ले, बॅकलिट हँन्डलबार कंन्ट्रोल, हँन्डस फ्री सिस्टिम सारखे फिचर्स, रायडर नेविगेशन, क्विक शिफ्टर आणि क्रुज कंट्रोल दिला जाणार आहे.