गरजू रुग्णांना वेळेपूर्वी अयवय मिळावेत यासाठी सरकारने ग्रीन कॉरिडोरची सुविधा चालू करण्यात आली होती. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अवयव वाहून नेणारी रुग्णवाहिका अशा परिस्थितीत अडकून राहते. त्यामुळे रुग्णाला वेळेपूर्वी अवयव देण्यास उशिर होतो. मात्र आता ड्रोनच्या सहाय्याने अवयव घेऊन जाता येणार आहेत.
ड्रोनच्या मदतीने अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या रुग्णाला पोहचविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय नागरीक उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी याबद्दल शुक्रवारी माहिती दिली आहे. तर रुग्णालयामध्ये ड्रोन तळ उभारण्यात येणार आहे. या ड्रोनची नोंदणी आजपासून सुरु झाली आहे. मात्र सध्या 2.0 वर याचे कार्य सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर अवयव वाहून नेणाऱ्या ड्रोनवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.
तर रुग्णालयात ड्रोन तळ तयार केल्यानंतर यासाठी हवाई मार्ग ठरविण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले आहे. या ड्रोनच्या मदतीने अवयव पोहचविणे सोपे होणार असून येत्या 15 जानेवारील ग्लोबल एविएशन समिटमध्ये यावर चर्चा करण्यात येणार आहे.