तुम्ही जर कमी किमतीमध्ये अधिक मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असाल तर, कदाचित तुमचा शोध इथे संपण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्या कार विषयी. ज्यांची किंमत आहे साधारण पाच लाख रुपयांच्या आसपास. आणि ज्या देतात दमदार मायलेजसोबत प्रवासाचा आनंदही. तर, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवी कोरी कार दारात आणण्यापूर्वी एकदा खालील कार्स आणि त्यांच्या फिचर्सवर एकदा नजर टाकायला काहीच हरकत नाही.
मारुती ऑल्टो 800
किंमत: 2.54 - 3.81 लाख , मायलेज (पेट्रोल)- 24.7 kmpl, मायलेज (CNG): 32.44 km/kg
मारुती ऑल्टो ही एक सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे. ही कार पेट्रोल इंधनावर प्रतिलीटर 24 किलोमिटर मायलेज देते. तर, सीएनजी वर ही कार 33.44 किलोमीटरचे मायलेच प्रति किलो देऊ शकते. (हेही वाचा, कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..)
रेनॉ क्विड
किंमत - 2.67 लाख से 4.64 लाख , माइलेज- 25 kmpl (पेट्रोल)
क्विड ही सुद्धा भारतात विकल्या जाणाऱ्या लोकप्रिय कार पैकी एक आहे. सध्यास्थितीत ही कार केवळ पेट्रोल व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे.
टाटा टियागो
किंमत- 3.35 लाख से 3.95 लाख, माइलेज- 25 kmpl (पेट्रोल)
टाटाच्या कारने मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपले वजन निर्माण केले आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
मारुति ऑल्टो K10
किंमत: 3.33 - 4.18 लाख, माइलेज (पेट्रोल): 24 kmpl, मायलेज (CNG): 32.26 km/kgऑल्टोची K10 या मॉडेलला मार्केटमध्ये जोरदार मागणी आहे. ही कार आपल्याला ऑटेमॅटीक व्हर्जनमध्येही मिळू शकते. या गाडीला 1.0 लीटर इंजिन, 67.1 bhp ची पॉवर आहे. ही गाडी मायलेजला एकदम भारी आहे. पेट्रोलवर ही गाडी प्रतिलीटर 24 किलोमीटर जाऊ शकते. तर, सीएनजीवर प्रतिकिलो 32.26 किमी जाऊ शकते. (हेही वाचा, घरी कुणीतरी आतुरतेने वाट पाहते ना! मग, गाडी चालवताना या गोष्टींचे भान ठेवा)
Hyundai Eon
किंमत: 3.30 - 4.66 लाख , मायलेज: 21 kmpl (पेट्रोल)
ही कारसुद्धा मायलेज आणि किंमत यांचे जबरदस्त मिश्रणआहे. खिशाला आणि प्रवासाला दोन्हीला परवडणारी अशी ही कार आहे.
(बातमीतील किंमतींबाबतचे सर्व आकडे दिल्ली आणि मुंबईतील एक्स शोरुममधीलआहेत. त्यात बदल होऊ शकतो.)