जर्मनची आलिशान कार निर्माता कंपनी Audi India यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी आणि कारच्या चाहत्यांसाठी एक अॅप लॉन्च केला आहे. हा अॅप आधीपासूनच MyAudi Connect अॅपचे अपडेट वर्जन आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकांना आणि कार खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना गरजेच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. या सेवांमध्ये आफ्टरसेल्स प्रोडक्ट्स आणि रोड साइड असिस्टेंट्स सारख्या सुविधा मिळणार आहेत. परंतु यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही आहे. कारण आता एका क्लिकवर फक्त या सर्व सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
या अॅपच्या मदतीने ऑडी कारच्या ग्राहकांना फक्त एका क्लिकवर सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्याचसोबत ऑडी कार खरेदी करायची असल्यास तुम्हाला येथून त्या संदर्भातील अधिक माहिती सुद्धा दिली जाणार आहे. ऐवढेच नाही तर टेस्ट ड्राइव्हसाठी सुद्धा तुम्ही अॅपच्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे. परंतु गाडी तुम्हाच्या पसंतीस पडून ती तुम्ही खरेदी करणार असल्यास ऑडी मर्चेंडाइजला भेट देऊ शकता. (Tata Motors कंपनी नागरिकांना भाड्याने देणार 15 लाखांची कार, 36 महिने चालवून झाल्यानंतर पुन्हा परत द्यावी लागणार)
ऑडी कारच्या अॅपच्या लॉन्चिंगवेळी ऑडी इंडियाचे प्रमुख श्री बलबीर सिंह ढिल्लो यांनी असे म्हटले आहे की, ऑडी इंडियात डिजिटल पद्धतीचा वापर करुन ग्राहकांना अधिक सुलभ आणि कार्यक्षमतेनुसार सहभागी करण्याचा प्रयत्न केला आहे. 2019 मध्ये पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आलेला MyAudi Connect अॅप ग्राहकांच्या पसंतीस पडला होता. त्यामुळे आता अत्यंत आनंद होत आहे की, नव्या तंत्रज्ञानासह लॉन्च करण्यात आलेला हा अॅप आता सुद्धा ग्राहकांची मदत करेल. इन-अॅप कस्टम ऑफर, एआर सारख्या नव्या सुविधा आणि टेस्ट ड्राइव्ह फंक्शन बुक करणे सुद्धा ग्राहकांना शक्य होणार आहे.
सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास हा अॅप फक्त कार खरेदी करणाऱ्यांसाठीच नव्हे तर कंपनीच्या कारसंदर्भातील अधिक माहिती करुन घेणाऱ्या नागरिकांना सुद्धा उपयोगी पडणार आहे. या अॅपवर कारच्या प्रत्येक मॉडेल संदर्भातील व्हिडिओ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्याचसोबत अॅपच्या मदतीने ऑडी शोरुम मध्ये वर्चुअली विजिट सुद्धा करु शकता येणार आहे. (Hyundai कंपनीकडून Aura या मॉडेलवर देण्यात येणार तब्बल 20 हजारापर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर्स)
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे कंपनीकडून सुरु करण्यात आलेल्या या सुविधेचा फायदा ऑडी कारचे चाहते असल्यांना होणार आहे. लोकांना या अॅपच्या मदतीने कोरोनापासून बचाव करत वर्चुअली कारचे इंटीरियर-एक्सटीरियर जवळून पाहता येणार आहे. ही सुविधा कोरोनाच्या काळात कारची विक्री वाढवण्यास मदत करेल अशी अपेक्षा केली जात आहे.