2021 Honda Amaze फेसलिफ्ट 6.32 लाखात भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
Honda Amaze (Photo Credits-Twitter)

होंडाने भारतात आपली बहुप्रतिक्षीत 2021 Amaze फेसलिफ्ट अखेर लॉन्च केली आहे. या दमदार सेडान कारची सुरुवाती किंमत 6.32 लाख रुपये आहे. ग्राहकांना या पॉप्युलर सेडान कारमध्ये रिवाइज्ड एक्सटीरियर पहायला मिळणार आहे. नव्या अमेजच्या इंटीरियरमध्ये काही अपडेट्स ही केले आहेत. या कारचे मुख्य आकर्षण असे की, ग्राहकांना एलईडी प्रोजेक्ट हेडलॅम्पसह रिवाइज्ड फ्रंट बंम्पर, एक द्विड फ्रंट ग्रिल आणि क्रोम सराउंडसह फॉग लाइट दिली जाणार आहे. अन्य ठिकाणी मॉडेलमध्ये एक नवे ड्युअल टोन अलॉय व्हिल, क्रोम इंसर्टसह रिफ्रेश रियर बंम्पर आणि सी-आकाराची एलईडी टेल लाइट मिळणार आहे.

कारच्या आतमधील बाजूला एक रियर व्यू-कॅमेरा पेक्षा लैस असून जो डॅशबोर्ड आणि डोर-पॅडसाठी तीन विविध व्यू देणार आहे. तसेच कारमध्ये पॅडल शिफ्टर्स, अॅपल कारप्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी आणि एक इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण दिले आहे, सब-फोर मीटर सेडान ही चार  वेरियंट्समध्ये उतरवली आहे. ज्यामध्ये E,S,V आणि VX चा समावेश आहे.

2021 Honda Amaze एक फाइव्ह सीटर सेडान असून जी तुम्ही सहज आपल्या परिवारातील 5 लोकांसाठी वापरु शकता.  भारतातील दमदार सेडान कार बद्दल बोलायचे झाल्यास या लिस्टमध्ये अमेज सुद्धा आहे.(Hyundai Launch I20 N line: ह्युंडाईची आय 20 एन लाइन 24 ऑगस्टला येणार बाजारात, जाणुन घ्या कारची वैशिष्ट्ये)

नवी अमेज फेसलिफ्ट मध्ये 1.2 लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जो 89bhp आणि 110Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, तसेच आणखी एक 1.5 लीटर i-DTEC डिझेळ इंजिन असणार असून जो 99bhp ची पॉवर आणि 200Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीने इंजिनसह ट्रान्समिशन सुद्धा ऑप्शन दिला आहे. त्यासाठी एक मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एक सीवीटी दरम्यान एक ऑप्शन मिळणार आहे.