Hyundai Launch I20 N line: ह्युंडाईची आय 20 एन लाइन 24 ऑगस्टला येणार बाजारात, जाणुन घ्या कारची वैशिष्ट्ये
Hyundai I20N line (Pic Credit - Hyundai Motor India)

ह्युंडाईची (Hyundai) नवीन आय 20 एन लाइन (I20N line) 24 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे, असे ह्युंडाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) सांगितले आहे. हे नवीन मॉडेल i20 हॅचबॅकचे परफॉर्मन्स स्पेशल व्हेरिएंट असेल. ज्यामध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा (Model) फक्त काही बदल केले जातील. आय 20 एन लाइन टीझरमध्ये समोर आले आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल आणि ड्युअल-टिप एक्झॉस्ट मिळेल. बाह्य डिझाइनमधील इतर बदलांमध्ये एक रिस्टाइल फ्रंट बम्पर, साइड स्कर्ट आणि इंटिग्रेटेड डिफ्यूझरसह एक नवीन मागील बम्पर समाविष्ट असेल. Hyundai i20 N ला नवीन मशीन-कट डिझाईनसह 17 इंचाचे अलॉय व्हील्स मिळतील. नवीन बाह्य रंग पर्याय देखील दिले जातील. तसेच समोर आणि मागे एन लाइन बॅज असतील.

या गाडीच्या इंटिरियर स्टाइलमध्ये बदल तितकासा होणार नाही. डॅशबोर्डचे डिझाइन सारखेच राहील परंतु केबिनला ऑल-ब्लॅक कलर स्कीम मिळण्याची शक्यता आहे.  प्रवेगक आणि ब्रेक पेडल स्पोर्टी दिसणारे मेटल युनिट्स असतील. तसेच स्टियरिंग व्हील नवीन तीन-स्पोक युनिट असेल.

इतर वैशिष्ट्यांमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लू लिंक कनेक्टेड कार टेक, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग इ. यात असणार आहे. एन लाइन i20 वर एकच इंजिन पर्याय 1.0-लिटर टर्बो GDI मोटर असेल. मानक मॉडेल प्रमाणेच ही मोटर जास्तीत जास्त 120 पीएस आणि 172 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. हे दोन ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असेल, म्हणजे 6-स्पीड IMT आणि 7-स्पीड DCT असेल. जरी पॉवर आकडेवारी प्रमाणित i20 पेक्षा वेगळी नसली तरी, एन लाईन व्हेरिएंट चालवणे अधिक मनोरंजक असेल.

ह्युंडाई स्पोर्टियर राइड-हँडलिंग बॅलन्ससाठी अतिरिक्त कार ठरेल. बॅलेन्स  सुधारण्यासाठी स्टीयरिंग पुन्हा तयार केले जाईल. तसेच नवीन एक्झॉस्ट इंजिनचा आवाज देखील सुधारेल. या गाडीची किंमत सुमारे 11 लाख रुपयांपासून एक्स-शोरूम सुरू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जी नियमित i20 पेक्षा किंचित जास्त महाग आहे.  बाजारात, फोक्सवॅगन पोलो टीएसएल आणि टाटा अल्टो टर्बो हे त्याचे जवळचे प्रतिस्पर्धी असतील.