New Maruti WagonR Car : मारुती सुझूकीच्या हॅचबॅक(Maruti WagonR hatchback ) स्वरूपातील लोकप्रिय कार वॅगनार आता नव्या स्वरूपात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. 23 जानेवारी 2019 दिवशी या कारचं भारतामध्ये लॉन्चिंग होणार आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वीच या कारची झलक आणि बुकिंग ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे. अवघ्या 11,000 रूपयांमध्ये या कारची बुकिंग करणं शक्य आहे. मारूती सुझुकीच्या ऑफिशिअल साईटवर लूक लॉन्च करण्यात आला असून डीलरशीप असणार्या शोरूममध्ये बुकिंग सुरू करण्यात आलं आहे.
Bookings open for the #BigNewWagonR with stronger looks and a more powerful 1.2L engine. pic.twitter.com/PFO4JMa6Cu
— Maruti Suzuki Arena (@MSArenaOfficial) January 14, 2019
नव्या Maruti WagonR कारचं वैशिष्ट्य काय ?
- नवी वॅगनार कार सात व्हेरिअंट्समध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे.. यामध्ये तीन व्हेरिअंटस 1.0-लीटर इंजिन आणि चार व्हेरिअंट 1.2-लीटर इंजिन इतक्या क्षमतेचे असतील.
- गाडीमध्ये फ्रन्ट सीटबेल्ट्स रिमॅंन्डर, स्पीड अलर्ट सिस्टीम, रिअर पार्किंग सेंसॉर असेल.
- 51 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असतील.
- जुन्या कारच्या तुलनेत नव्या कारचं वजन 50 ते 65 किलो कमी असण्याची शक्यता आहे. मात्र तरीसुद्धा त्यामध्ये अधिक जागा असेल.
- सात इंचाची टाचस्क्रीनसह इंफोटेनमेन्ट सिस्टिम असेल.
- गाडीत 1 लिटरचे 68 बीएचपी ऊर्जा निर्माण करणारे इंजिन असेल.
- नवी व्हॅगनार कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिन्ही स्वरूपात उपलब्ध असेल.
WagonR कारची किंमत काय असेल?
नव्या वॅगनार कारची किंमत सुमारे4.5 ते 6.5 लाख असण्याची शक्यता आहे.
मारूती सुझुकीच्या या नव्या WagonR कारची टक्कर सध्या बाजारात असलेल्या टाटा टिआगो, सँट्रो, दॅटसन गो या गाड्यांसोबत असणार आहे.