US and Pakistan Flags (Photo Credits: Pixabay)

पुलवामा हल्ला, दहशतवाद्यांना दिलेली सुरक्षितता यामुळे वातावरण तापलेले असताना अमेरिकेने पाकिस्तानाविरोधात कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी अमेरिकन व्हिसाची मुदत कमी करण्यात आली आहे. पूर्वी 5 वर्षांसाठी असलेला व्हिसा आता केवळ तीन महिन्यांसाठी दिला जाणार असल्याची माहिती अमेरिकन दुतावासाच्या प्रवक्तांनी दिली आहे.

हा नवा नियम पाकिस्तानी पत्रकारांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी पत्रकारांना तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ अमेरिकेत राहता येणार नाही. तर  पाकिस्तानी नागरिकांसाठी 5 वर्षांसाठी असलेली व्हिसा मुदत आता कमी करुन केवळ 1 वर्ष करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिसाच्या फी मध्येही वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी पूर्वी 160 डॉलर असलेली फीज आता वाढवून 192 डॉलर करण्यात आली आहे.

अमेरिकन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय व्हिसा पॉलिसी आणि फी सुधारण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयामुळे घेण्यात आला आहे. इस्लामाबादने यापूर्वीच अमेरिकन नागरिकांसाठी व्हिसा मर्यादा कमी करून फी वाढली आहे.